जिल्ह्यात अवकाळीचा फेरा सुरूच!

By Admin | Updated: March 11, 2015 00:56 IST2015-03-11T00:56:26+5:302015-03-11T00:56:26+5:30

पुरंदरच्या बहुतांश भागात विशेषत: पूर्व पट्ट्यात आज ( दि. १० ) अवकाळी पावसाने अचानक दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले.

In the district, there is a continuous round of round-the-clock! | जिल्ह्यात अवकाळीचा फेरा सुरूच!

जिल्ह्यात अवकाळीचा फेरा सुरूच!

सासवड : पुरंदरच्या बहुतांश भागात विशेषत: पूर्व पट्ट्यात आज ( दि. १० ) अवकाळी पावसाने अचानक दमदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
आज सकाळपासूनच हवामान ढगाळ होते. कमाल तापमान ३१. ४, तर किमान तापमान १२. ६ एवढे नोंदले गेले. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पर्जन्यवृष्टी झाली. या पावसाने शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला गहू, हरभरा, कांदा आदी पिकांसह जनावरांच्या चाऱ्याच्या पिकांचेही अतोनात नुकसान झाले आहे.
मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकरी सावरतो न सावरतो तोच आजच्या अवकाळी पावसाने बळीराजाचे कंबरडे मोडल्याची स्थिती निर्माण झाली आहे. सुमारे २ तास झालेल्या या पावसाने सखल भागात पाणी साठून राहिले. अनेक शेते जलमय झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
सासवड परिसरात आज १३.२ मिलिमीटर पाऊस झाल्याचे आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या वेधशाळेचे व्यवस्थापक नितीन यादव यांनी सांगितले.

Web Title: In the district, there is a continuous round of round-the-clock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.