जिल्हा नियोजन समितीचा ५२० कोटी रुपयांचा आराखडा मंजुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:01 IST2021-02-05T05:01:13+5:302021-02-05T05:01:13+5:30
पुणे : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२१-२२ साठी मंजूर प्रारूप आराखड्यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ५२० कोटी ७८ ...

जिल्हा नियोजन समितीचा ५२० कोटी रुपयांचा आराखडा मंजुर
पुणे : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत सन २०२१-२२ साठी मंजूर प्रारूप आराखड्यात जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ५२० कोटी ७८ लाख रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला.
अनुसूचित जाती उपयोजना अंतर्गत १२८ कोटी ९३ लाख रुपये व आदिवासी उपयोजना अंतर्गत ४४ कोटी ३८ लाख रुपयांच्या कमाल आर्थिक मर्यादेत प्रारूप आराखड्यांना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२०-२१ साठी मंजूर नियतव्यय आणि झालेला खर्च तसेच २०२१-२२ साठी प्रस्तावित नियतव्ययासाठी जिल्हा नियेाजन समितीची बैठक पालकमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात झाली. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार सुप्रिया सुळे, गिरीश बापट, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह सर्व आमदार तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.