शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

जिल्हास्तरीय स्पर्धेस पाच, विभागीय स्पर्धेस दहा गुण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 02:55 IST

जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही क्रीडागुण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पिंपरी : जिल्हास्तरीय तसेच विभागीय स्पर्धांमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंनाही क्रीडागुण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळताना पहिले ३ क्रमांक मिळविणाºया खेळाडूंना ५ गुण तर विभागीय स्पर्धेत खेळणाºया खेळाडूंना १० गुण या पद्धतीने क्रीडा सवलतीचे गुण दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून दिले जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळाला आहे.याबाबतचे शुद्धीपत्रक राज्य सरकारच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शुक्रवारी जारी केले. पूर्वी राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेतील खेळाडूंना क्रीडा सवलतीचे गुण दिले जायचे. जिल्हा तसेच विभागीय स्तरावरील स्पर्धेत खेळणाºया खेळाडूंना हे गुण मिळत नव्हते. यामुळे खेळाडूंचे नुकसान होत होते. याबाबत क्रीडा संघटनांसह पालकांनीही संताप व्यक्त केला. दरम्यान, २० डिसेंबर २०१८ ला जाहीर झालेल्या शासन निर्णयात जिल्हास्तरीय, विभागीय तोच राज्यस्तरीय स्पर्धांत खेळणाºया विद्यार्थ्यांना पहिल्या ३ क्रमांकासाठी अनुक्रमे ३, ५, ७ गुण देण्यात आले होते. मात्र, हे अत्यंत कमी गुण असल्याने याबाबत नाराजीचा सूर उमटला. त्यामुळे या गुणांमध्ये वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला. यासंदर्भात लवकरच बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी पुण्यात झालेल्या ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’च्या समारोपापूर्वी दिले होते. क्रीडामंत्र्यांनी आश्वासन पूर्ण करताना जिल्हा तसेच विभागीय स्पर्धेत खेळणाºया विद्ययार्थ्यांना समाधानकारक गुण जाहीर केले आहेत.जिल्हास्तरावरील स्पर्धेत पहिल्या तिन्ही क्रमांकांना ५ गुण देण्यात येतील. विभागीय स्पर्धेतील पहिल्या ३ क्रमांकाच्या खेळाडूंना १० गुण मिळणार असून सहभागासाठी ५ गुण असतील. यासह राज्यस्तरीय स्पर्धेसाठी १५ गुण असून सहभागासाठी १० अथवा १२ गुण असतील. जिल्हास्तरावरून थेट राज्यस्तरावर सहभाग असल्यास १० गुण व विभाग स्तरावरुन राज्य स्तरावर सहभाग असल्यास १२ गुण दिले जातील. राष्ट्रीय स्पर्धेतील पहिल्या ३ क्रमांकासाठी २० गुण असून सहभागासाठी १५ गुण मिळतील. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाºया खेळाडूंना २५ गुण (पहिले तीन क्रमांक) असून सहभागासाठी २० गुण असतील.असे मिळणार गुण...क्रीडा स्पर्धा                 प्रावीण्य गुण*     सहभागी गुणजिल्हास्तरीय स्पर्धा              ५                      ००विभागीय स्पर्धा                  १०                      ०५राज्यस्तरीय स्पर्धा              १५              १० अथवा १२राष्ट्रीय स्पर्धा                      २०                       १५आंतरराष्ट्रीय स्पर्धा             २५                      २०एनसीसी, स्काऊट/गाईडच्या विद्यार्थ्यांना मिळणारे गुणविभाग शिबिर / संचलन गुणएनसीसी बेसिक लीडरशिप कॅ म्प (बीएलसी)          ३ गुणएनसीसी पूर्व प्रजासत्ताकदिन शिबिर                       ५ गुणएनसीसी प्रजासत्ताकदिन संचलन,शिबिर                १० गुणएनसीसी राष्ट्रीय स्तर, शिबिर / संलग्न स्पर्धाविजेते    १५ गुणएनसीसी आंतरराष्ट्रीय यूथ एक्सचेंज                        २० गुणस्काऊट व गाईड राज्यपाल पदकप्राप्त विद्यार्थी       ३ गुणस्काऊट व गाईड आंतरराष्ट्रीय जांबोरी शिबिर        १० गुण

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा