शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

जिल्ह्यात कायदा, सुव्यवस्था बिघडली! नागपूर हिवाळी अधिवेशनात होणार चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:59 IST

आजपासून नागपूर येथे सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न मांडण्याची तयारी आमदारांनी केली आहे.

पुणे : आजपासून नागपूर येथे सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुणे जिल्ह्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न मांडण्याची तयारी आमदारांनी केली आहे. सध्या जिल्ह्यात खून, दरोडे, बलात्कारांची मालिकाच सुरू झाली असून कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, कर्जमाफीची दमडीही शेतक-यांच्या हातात पडली नाही, शेतमालाला हमीभावाचा प्रश्न प्रलंबित आहे. शेतकºयांच्या सात-बारावरील शेरे काढलेले नाहीत, रस्त्यांचे नियोजन रखडलेले आहेत. एमआरडीसीसह सिंचन प्रकल्प अधुरे आहेत, याबाबत आमदारांनी राज्य सरकारकडे उपाययोजनेची मागणी करण्याचे ठरविले आहे.आंबेगाव तालुक्यात गेल्या दीड महिन्यात अवसरी -भोरवाडी येथे तीन ते चार घरांवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामध्ये एका वृद्ध महिलेला जबर मारहाण झाली आणि गेल्या दीड महिन्याच्या उपचारानंतर त्या महिलेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लांडेवाडी येथे अशाच प्रकारचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला, तेथे महिलांवर अत्याचार, मारहाण करण्याचा प्रयत्न केला गेला व घरे फोडून ऐवज लुटला गेला. अशाच स्वरूपाच्या घटना खेड व इतर तालुक्यांमध्ये घडल्या आहेत.राज्याच्या व जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाने जनतेला धीर देण्यासाठी चोख उपाययोजना करणे आवश्यक आहे. सारख्या घडत असलेल्या घटना पाहता पोलीस प्रशासनाचे नियंत्रण राहिल्यासारखे वाटत नाही. कायदा व सुवस्थेचे राज्य असल्याचे दाखविले पाहिजे. पोलीस कर्मचारी कमी असल्याचे बोलले जाते, मात्र ही बाब जनतेशी संबंंधित नाही तर सरकारशी संबंधित आहे. त्यामुळे या संदर्भात राज्याच्या हिवाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून जिल्ह्यातील लोकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या व चिंतेच्या वातावरणाची कल्पना सरकारला करून देणार आहोत.- दिलीप वळसे-पाटील, आमदार आंबेगावशेतीची वृद्धी कमी : कर्जमाफीसंदर्भात आज सहा महिने झाले, तरी सरकारने शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा केले नाहीत. आज सगळीकडे शेतकरी हवालदिल आहे, या सरकारचे धोरण शेतकºयांच्या बाजूचे नाही तर विरोधी आहे. चुकीच्या धोरणांमुळे शेतीची वृद्धी कमी होत चालली आहे. चूक झाकण्यासाठी भारनियमन : एकेकाळी देशात व राज्यात वीज नव्हती, म्हणून भारनियमन होते. परंतु, सध्या देशात व राज्यात  एवढी वीज उपलब्ध आहे, की २४ तास वीज देता येईल. परंतु कोळसा नाही, पैसे नाही, व्यवस्थापन चुकीचे होत असल्यामुळे हे सरकार शेतकºयांना २४ तास वीज देऊ शकत नाही. आपली चूक झाकण्यासाठी भारनियमनाचा प्रयत्न भाजपाने केला. अधिवेशनात विजेच्यासंदर्भात आवाज उठवणार.जिल्ह्याच्या विकास निधीवर डल्लामुख्यमंत्री ग्रामसडक योजना करताना सरकारने फतवा काढून जिल्हा नियोजन समितीमध्ये दिलेल्या निधीपैकी १५ टक्के निधी कपात करून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी वर्ग करण्याच्या सूचना दिल्या. वास्तविक सरकारने राज्याच्या बजेटमधून पैसे देणे आवश्यक आहे. मात्र, जिल्ह्याच्या विकास निधीवर डल्ला मारण्याचे काम राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासावरपरिणाम होणार आहे, यासह अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर माजी विधानसभाध्यक्ष, आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधले.आंदोलक शेतकरी, बैलगाडामालकांवरील खटले मागे घ्यावेत!पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण, तळेगाव, राजगुरुनगर येथे वारंवार होणाºया वाहतूककोंडीसाठी महामार्गाचे रखडलेले काम मार्गी लावण्यात येईल, स्थानिकांना एमआयडीसीमध्ये नोकºया मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करणार आहे. तालुक्यात विजेचा प्रश्न गंभीर आहे, यासाठीही प्रयत्न करणार आहे. आदर्श ग्रामीण योजना आली, मात्र यासाठी पैसा नाही. फक्त आश्वासने शासनाने दिली. आमदार आदर्श गाव योजना फेल आहे. याबाबत अधिवेशनात आवाज उठविणार आहे. सेझ, विमानतळ यासाठी शेतकºयांनी आंदोलन केले, त्यांच्यावर खटले आहेत, तसेच बैलगाडामालकांवरील जे गुन्हे दाखल आहेत ते मागे घेण्यासाठी शासनाला विनंती करणार आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागात शेतकºयांच्या जमिनीवर जे शिक्के पडले आहेत ते काढण्यासाठी प्रश्न उपस्थित करणार आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा भीमाशंकर वांद्रे कर्जत रस्ता मान्यता, तालुक्यातील शंकराची १२ ज्योतिर्लिंग मंदिरे पर्यटनासाठी विकसित करणे, औद्योगिकीकरणामुळे वाढलेल्या लोकसंख्येमुळे पोलीस प्रशासनावर येणारा ताण लक्षात घेता नवीन पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला त्वरित मान्यता देणे, तसेच जलयुक्त शिवारची रखडलेली कामे त्वरित सुरू करणे याबाबत अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहे.- सुरेश गोरे,आमदार खेड तालुकाहमीभावासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मितीखडकवासला प्रकल्पाच्या प्रश्नांसाठी विनंती अर्ज, दौंडच्या प्रलंबित क्रीडा संकुलासाठी जागेच्या मागणीसाठी प्रयत्न, यवत पोलीस ठाण्याच्या इमारतीसाठी जागेसंदर्भात मागणी, शेतमालाला हमीभाव देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची निर्मिती करण्याबाबत मागणी, दौंड येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा सुरू करण्याचे दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी मागणी, दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्याचा प्रलंबित प्रस्तावावर मार्ग काढण्यासाठी, तसेच वरवंड येथील ट्रामा केअर युनिटसाठी प्रयत्न करणार आहे. खडकवासला प्रकल्प, जनाई शिरसाई, तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेतील खुपटेवाडी फाटा येथे तांत्रिक अडचणीमुळे शेतकºयांना पाणी मिळू शकत नसल्याबाबत प्रश्न उपस्थित करणार, अष्टविनायक मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी मागणी करणार आहे. - राहुल कुल, आमदार, दौैंडपुणे- नाशिक महामार्गावरची कोंडी कधी सुटणार?राजगुरुनगर : पुणे-नाशिक महामार्गाचे बाह्यवळणाचे काम रेंगाळल्यामुळे राजगुरुनगर शहरात वाहतूककोंडी नित्याची बनली आहे. राजगुरुनगर शहरात आज दिवसभर वाहतूककोंडी झाली होती. शनिवार, रविवार सुटीचा दिवस, त्यातच लग्नतिथी जोरात असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणात झाल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. त्यामुळे बराच वेळ नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकून बसावे लागले. या कोंडीत नागरिक, प्रवासी, वºहाडी मंडळींना तसेच वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. वाहतूककोंडी सोडविता सोडविता ट्रॅफिक पोलिसांच्या नाकीनऊ आले.गुंजवणीचा पाणी अहवाल आक्षेपार्हवेल्हे तालुक्यातील गुंजवणीचे पाणी बंद पाइपलाइनद्वारे पुरंदरला जाणार असून, वेल्हे तालुक्यातील शेतकºयांना आपल्या शेतीसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याचा अहवाल राज्यस्तरीय समितीने दिला आहे. यात भविष्यात वेल्हे तालुक्यातील शेतकºयांनी आपली भातशेती ठिबक सिंचनाद्वारे करावी लागणार आहे. या राज्यस्तरीयसमितीने गहू, हरभरा, ज्वारी यांसारखी पिके वेल्ह्यात घेता येणार नाहीत, असेदेखील सुचविले आहे. यामुळे पीक पॅटर्नच बदलणार आहे. याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असून, अधिवेशनातही प्रश्न उपस्थित करणार आहे. याशिवाय भोर एमआयडीसी प्रश्न, महाड-पंढरपूर, मढेघाट, ताम्हिणी रस्त्याबाबतचा प्रश्न उपस्थित करणार आहे.- संग्राम थोपटे, आमदार, भोर- वेल्हा- मुळशीगुंजवणीचे अडथळे दूर; प्रकल्पाला वेगगुंजवणी प्रकल्पातील स्थानिकांनी हरित लवाद आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण आदींच्या माध्यमातून आणलेले सर्व अडथळे दूर झालेले आहेत. यामुळे आता या प्रकल्पाला वेग देणे, फुरसुंगी व उरुळी देवाची संयुक्त ७३ कोटींच्या संयुक्त पाणी योजनेचे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. ती लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. जेजुरीनजीकच्या औद्योगिक वसाहतीच्या कामाला वेग देण्यासाठी लवकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावी, तालुक्यात होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबतचे तांत्रिक आक्षेप आता दूर झालेले आहेत. स्थानिक शेतकºयांचे हित पाहताना योग्य तो मोबदला देऊन विमानतळासाठी भूसंपादन आणि कामाला सुरुवात करण्यासाठी आग्रह धरणार आहोत.- विजय शिवतारे,आमदार, पुरंदरतर हे सरकार चालणार कसे?प्रत्येक सरकारी खात्यात कर्मचारी कमी आहेत, नवीन भरती सरकार करत नाही, ठेकेदारी पद्धतीने कर्मचारी घेण्याची पद्धत या सरकारने अवलंबली आहे. कारण, सरकार आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. विकासकामांना सरकारने ३० टक्के कट लावला आहे. सरकारला कर्मचाºयांचे पगार करायला पैसे नसतील, नवीन भरती करणार नसतील,असलेल्या कर्मचाºयांमध्येदेखील लोक कमी करण्याचे धोरण या सरकारने आखले तर हे सरकार चालणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.सात-बारावरील पुनर्वसनाचे शिक्के काढा...शिरूर-हवेली तालुक्यातील शेतकºयांच्या सात-बारा उताºयावरील भामा-आसखेड व चासकमान पुनर्वसनाचे शिक्के उठविण्याबरोबरच शेतकºयांना शासकीय दरापेक्षा कमी बाजारभाव देण्याविरोधात आवाज उठविणार आहे. शिरूर-हवेली तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जिल्हा नियोजन याबरोबरच अष्टविनायक मार्ग जोडण्याच्या निधीतून तब्बल साडेतीन हजार कोटींच्या रस्त्यांची कामे मार्गी लागली असल्याने येत्या काही महिन्यांत शिरूर-हवेली तालुका रस्त्यांच्याबाबतीत सधन होण्यास मदत मिळणार असल्याने या हिवाळी अधिवेशनात चासकमान व भामा-आसखेड धरणग्रस्तांचे शिरूर-हवेली तालुक्यातील स्थानिक शेतकºयांच्या सात-बारा उताºयावरील असणारे पुनर्वसनाचे शिक्के काढणे तसेच खासगी व शासकीय दूध संघाकडून शेतकºयांच्या दुधाला शासनाने ठरवून दिलेल्या दूधदरापेक्षा कमी दुधाचा दर देण्यात येत असल्याने याविरोधात आवाज उठविणार आहे.- बाबूराव पाचर्णे, आमदार,

 

टॅग्स :Puneपुणे