शहरं
Join us  
Trending Stories
1
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
2
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
3
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
4
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
5
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
6
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
7
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
8
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
9
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
10
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
11
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
12
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
13
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
14
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
15
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
16
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
17
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
18
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
19
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
20
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

जिल्हा न्यायालयात आता सीसीटीव्हीचा वॉच, १७४ कॅमेरे बसविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 01:47 IST

सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

पुणे : सुरक्षेच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील जिल्हा न्यायालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची गेल्या अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. न्यायालयाच्या आवारामध्ये विविध ठिकाणी १७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी सरकारकडून ८६ लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर करण्यात आला आहे.न्यायालयातून विविध गुन्ह्यांतील आरोपी फरारी झाल्याचे तसेच कोर्टरूममधून फाइल चोरीला जाणे, नळ व दुचाकीचोरीला जाण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत. तर, आरोपींनी वकिलांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर परिसराची सुरक्षाव्यवस्था भक्कम करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्याची मागणी वकील आणि पक्षकारांकडून करण्यात येत होती. त्याबाबत पुणे बार असोसिएशनकडून (पीबीए) देखील वेळोवेळी पाठपुरवा करण्यात आला होता, अखेर ही मागणी मंजूर झाली असून, येत्या महिन्याभरात सीसीटीव्ही लावण्यात येतील. त्यावर लक्ष ठेवण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आल्याची माहिती पीबीपीएचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार यांनी मंगळवारी दिली.न्यायालय आवाराचा सुरक्षेसाठी सध्या ८० पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची संख्या आणि न्यायालय परिसराचा विचार करता पोलिसांचे बळ कमी पडत होती. या कॅमेºयांमुळे पोलिसांवर पडणारा ताण कमी होणार असून, न्यायालयामध्ये दाखल होणाºया प्रत्येकावर वॉच ठेवणे सोपे होणार आहे. सध्या न्यायालयात सुरक्षेच्या दृष्टीने पुरेशा उपाययोजना नाहीत. न्यायालयाचे गेट वगळता आतील भागात कॅमेरे नाहीत. तर उपलब्ध कॅमेºयांची संख्यादेखील कमी आहे. तसेच जुन्या, नव्या इमारतीच्या प्रवेशद्वारावर बसविण्यात आलेल्या मेटल डिटेक्टरचादेखील फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे सीसीटीव्हीमुळे न्यायालयातील सुरक्षा वाढणार आहे.>या ठिकाणी असणार सीसीटीव्हीआवारातील ६ इमारती, ४ प्रवेशद्वार, न्यायालयात येणारे दोन मुख्य मार्ग, पी. एम. एस. हॉस्टेल ते कामगार पुतळा मुख्य रोड, संचेती पूल ते कामगार पुतळा, मुख्य रस्ता, सर्व कंपाऊंड वॉल, संपूर्ण पार्किंग, न्यायालयातील सर्व कॅन्टीन, आरोपी लॉकर परिसर, सोसायटी कार्यालय, अशोक हॉल ध्वज व बागेचा परिसर, जुन्या आणि नव्या इमारतीतील सर्व जिने, लिफ्ट, नाझर ट्रेझरी कार्यालय, रेकॉर्ड रूम, महत्त्वाचे कोर्ट चेंबर, मुख्य न्यायाधीशांचा कोर्ट हॉल, मोक्का कोर्ट, सीबीआय न्यायालय आदी ठिकाणी १७४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असे अ‍ॅड. पवार यांनी सांगितले.>गर्दीचे नियोजन करणे होणार सोपेसध्या न्यायालयात डीएसके, माओवादी संबंध प्रकरण, डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या यांसह अनेक महत्त्वाचे खटले सुरू आहेत. या खटल्यातील आरोपींना न्यायालयात घेऊन येताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. इतर आरोपींना भेटण्यासाठी येणाºया नातेवाइकांची संख्या अधिक असल्याने न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. या गर्र्दीचे नियोजन करण्यात पोलिसांना वेळ द्यावा लागतो. सीसीटीव्हीमुळे पोलिसांचा ताण कमी होईल.