शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 21:43 IST

चांगल्या कामाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी हा सन्मान घोषित केला.

पुणे: जिल्ह्यात मतदार नाव नोंदणी अभियान, छायाचित्र नसलेले मतदार, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रियां व तृतीय पंथी मतदार होण्यासाठी घेतलेली विशेष मोहीम, मतदार जनजागृती अभियानामध्ये केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने पुण्याचे जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांना उत्कृष्ट जिल्हाधिकारी हा सन्मान घोषित केला. 

जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख दर गुरुवारी बैठक घेऊन निवडणूक कामांचा नियमित आढावा घेतात. पुणे जिल्ह्यात 1 जानेवारी ते 5 डिसेंबर 2021 या कालावधी मध्ये एकुण 1223413 फॉर्म प्राप्त झालेले होते. यापैकी 1223401 फॉर्मवर अंतिम निर्णय घेण्याची कार्यवाही पुर्ण झाली आहे. त्यामुळे या मोहिमे अंतर्गत जिल्हयात तब्बल 2 लाख 70 हजार 665 इतक्या नवीन मतदारांची वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षीच्या अंतिम मतदार यादीत 37,59,289 महिला मतदारांच्या तुलनेत यावर्षी प्रारुप मतदार यादीमध्ये 1,17,959 व अंतिम मतदार यादीमध्ये 1,48,151 महिला मतदारांची नोंदणी झालेली आहे.  अंतिम मतदार यादीमध्ये 38,85,676 इतक्या महिला मतदार आहेत.

दरम्यान पुणे जिल्हयाच्या मतदार यादीमध्ये लाखो मतदार छायाचित्र नसलेले मतदार होते. यासाठी देखील विशेष मोहिम घेऊन मोठ्याप्रमाणात छायाचित्र गोळा करण्यात आली.   देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रियां व तृतीय पंथी यांच्यासाठी कार्यरत असलेल्या स्वंयसेवी संस्थाच्या बैठकीच्या माध्यमातून जनजागृती करुन नोंदणी वाढविण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात आले. त्यांना मतदार नोंदणी व मतदान विषयक त्यांच्या हक्कांविषयी जागृत करण्यात आले. तसेच, मतदार संघस्तरावरुन विशेष मोहिमेच्या कालावधी मध्ये देह व्यवसाय करणा-या स्त्रियां व तृतीय पंथी यांचेकरिता जनजागरुकता कार्यक्रमाचे आयोजन केले.

टॅग्स :Puneपुणेcollectorजिल्हाधिकारीElectionनिवडणूकSocialसामाजिकGovernmentसरकार