पठारवाडी प्रलंबित रस्त्याच्या कामास जिल्हाधिकारी यांनी दिली अखेर मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:31+5:302021-03-04T04:17:31+5:30
निवडणुकीच्या काळात मते मिळवण्यासाठी या रस्त्याचा वापर सर्वच राजकीय पक्षांनी केला, मात्र निवडणूक झाली की याकडे समस्येकडे दुर्लक्ष केले ...

पठारवाडी प्रलंबित रस्त्याच्या कामास जिल्हाधिकारी यांनी दिली अखेर मान्यता
निवडणुकीच्या काळात मते मिळवण्यासाठी या रस्त्याचा वापर सर्वच राजकीय पक्षांनी केला, मात्र निवडणूक झाली की याकडे समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याने पाठरवाडीकरांना अडचणीला सामोरे जावे लागत होते. संबंधित रस्ता नूतनीकरण करण्यासाठी पठारवाडी ग्रामस्थांनी अनेक वर्षे लढा दिला आहे. मात्र आता प्रतीक्षा आहे ती रस्त्याचे नूतनीकरण काम सुरू होण्याची आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला तसेच अत्यंत खराब पठारवाडी रस्ता निधी मंजूर झाल्याने जमीरभाई काझी, अशोक बिरदवडे, कुमार गोरे, आनंद गायकवाड, नीलेश कड पाटील, बाळासाहेब पठारे, नवनाथ पठारे, किरण पठारे तसेच पठारवाडी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांचे आभार मानले आहे.
पठारवाडी रस्ता जिल्हा एकात्मिक रस्ते योजनेत ग्रामीण मार्ग क्रमांक ६८ म्हणून हा समाविष्ट केला आहे. चाकण नगरपरिषदेने सदर रस्ताचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला होता. परंतु विकास निधी मंजूर करताना जाणीवपूर्वक या रस्त्याचा प्रस्ताव बाजूला ठेवून काम प्रलंबित ठेवण्याचे काम केले गेले होते, यावर शहर काँग्रेस तर्फे तीव्र आक्षेप लेखी निवेदन दि. ११/०२/२०२१ रोजी देऊन, रस्ता निधी तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात आली होती. तसेच २२/०२/२०२१ रोजी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन रस्त्याच्या नूतनीकरण करण्यासाठी शासन निधीतून उपलब्ध करून देण्यासाठी विनंती करण्यात आली होती.जिल्हाधिकारी यांनी त्वरित प्रस्ताव मागवून ६४ लाख ९० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. जिल्हाधिकारी यांनी तातडीने व्यक्तिगत लक्ष घालून प्रशासकीय मान्यता दिली असून त्याबाबत निविदा प्रक्रियादेखील प्रसिद्ध होऊन पुढील प्रक्रियादेखील सुरू झाली असून, लवकरच कामास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
चाकण नगरपरिषद हद्दीतील पठारवाडीचा रस्ता.