कडाचीवाडी येथे विविध ‘विशेष’ पुरस्कारांचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:16 IST2021-09-09T04:16:35+5:302021-09-09T04:16:35+5:30

याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास धनवटे, संजीवनी युवा विकास युवा मंचचे अध्यक्ष दत्तात्रय खांडेभराड, चाकण विभागप्रमुख ...

Distribution of various 'special' awards at Kadachiwadi | कडाचीवाडी येथे विविध ‘विशेष’ पुरस्कारांचे वितरण

कडाचीवाडी येथे विविध ‘विशेष’ पुरस्कारांचे वितरण

याप्रसंगी ज्येष्ठ नेते अशोक खांडेभराड, शिवसेना तालुकाप्रमुख रामदास धनवटे, संजीवनी युवा विकास युवा मंचचे अध्यक्ष दत्तात्रय खांडेभराड, चाकण विभागप्रमुख मंगेश पऱ्हाड, ॲड. किरण झिंजुरके, उद्योजक पांडुरंग लष्करे, सरपंच महादेव बचुटे, उपसरपंच सोनल कोतवाल, ग्रामपंचायत सदस्या रूपाली खांडेभराड, प्रियांका कड, निर्मला कड, सपना कड, बाळासाहेब कड, राजाराम ठाकर, नाणेकरवाडीचे उपसरपंच नितीन नाणेकर, सुनील कड, विशाल कड, के. डी. कड, तलाठी श्याम वालेकर, ग्रामसेविका नीलिमा जाधव, सतीश कड, ॲड. श्रीकांत कड, कैलास खांडेभराड, बळीराम खांडेभराड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, गावातील प्रत्येक कुटुंबाला संजीवनी युवा विकास युवा मंचच्या वतीने तुळशीचे रोप भेट देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीवनी युवा विकास युवा मंचच्या तरुण कार्यकर्त्यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. डी. कड यांनी, तर आभार अध्यक्ष दत्तात्रय खांडेभराड यांनी आभार मानले.

--

फोटो क्रमांक : ०८शेलपिंपळगाव विविध पुरस्कार

फोटो ओळ : कडाचीवाडी (ता. खेड) येथे फुलाबाई खांडेभराड यांच्या हस्ते ‘आदर्श सरपंच’ पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

Web Title: Distribution of various 'special' awards at Kadachiwadi