अपंग व्यक्तींना वाफेच्या मशिनचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:10 IST2021-05-22T04:10:15+5:302021-05-22T04:10:15+5:30

यावेळी बेलसर गावचे माजी सरपंच बाळासाहेब जगताप, भिवडी वीर गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश राऊत, दिव्यांग संघटनेचे ...

Distribution of steam machines to persons with disabilities | अपंग व्यक्तींना वाफेच्या मशिनचे वाटप

अपंग व्यक्तींना वाफेच्या मशिनचे वाटप

यावेळी बेलसर गावचे माजी सरपंच बाळासाहेब जगताप, भिवडी वीर गटाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष महेश राऊत, दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल बनकर, काँग्रेसच्या युवती उपाध्यक्ष हर्षदा फंड, युवा नेते तुषार कुदळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश बुधे, यात्रा कमिटी सदस्य उत्तम आबा जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

व्यक्तीला कोरोना झाला असेल तर त्याने व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये. परंतु, त्यांनी अत्यावश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. प्रत्येकाने घराबाहेर पडताना तोंडाला मास्क बांधणे, हात सतत धुणे, सॅनिटायझर करणे, गर्दीमध्ये न मिसळणे व गर्दी जमा होणार नाही यासाठी प्रबोधन करणे व दोन व्यक्तींमधील सुरक्षित अंतर राखणे यास प्राधान्य देणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बेलसर ग्रामपंचायत सदस्य कैलास जगताप यांनी सांगितले.

२१ जेजुरी

Web Title: Distribution of steam machines to persons with disabilities