विठ्ठलवाडी येथे सॅनिटायझरचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:11 IST2021-04-23T04:11:10+5:302021-04-23T04:11:10+5:30
आजच्या कोरोनाच्या या भयानक परिस्थितीत अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विठ्ठलवाडी गावचे विद्यमान उपसरपंच महेंद्र गवारी यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला ...

विठ्ठलवाडी येथे सॅनिटायझरचे वाटप
आजच्या कोरोनाच्या या भयानक परिस्थितीत अनावश्यक खर्चाला फाटा देऊन विठ्ठलवाडी गावचे विद्यमान उपसरपंच
महेंद्र गवारी यांनी गावातील प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझरचे वाटप करण्याचा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला.
रमेश शिंदे, पीडीसीसी बँकेचे आधिकारी तुषार लोखंडे, आयडीबीआय बँकेचे शाखा अधिकारी विशाल कांबळे व गावातील ग्रामस्थांना सॅनिटायझर देऊन या उपक्रमाचा प्रारंभ केला.
दरम्यान विठ्ठलवाडी येथील युवक वैभव गवारे,संतोष गवारे यांनी तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य कर्मचाऱ्यांनाही हॅन्डवॉश व बिस्किटाचे वाटप केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा घोरपडे,सामाजिक कार्यकर्ते मधुकर दोरगे,माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर राऊत,सुभाष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य संतोष गायकवाड,पंकज गवारे, दीपक गवारे उपस्थित होते.