सुंदरबाई शाळेत सुरक्षा किटचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:22+5:302021-02-05T05:20:22+5:30
चंदननगर : पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व सफाई कर्मचारी यांना माजी नगरसेविका उषा ...

सुंदरबाई शाळेत सुरक्षा किटचे वाटप
चंदननगर : पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात आल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक व सफाई कर्मचारी यांना माजी नगरसेविका उषा कळमकर यांच्या वतीने शारीरिक सुरक्षेसाठी सुरक्षा किटचे वाटप करण्यात आले.
शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर व सफाई कर्मचाऱ्यांसाठी मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोज वाटप केले. तसेच येत्या काही दिवसांत परिसरातील सर्व शाळांमध्ये शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिर करण्याचे प्रस्तावित आहे, असे माजी नगरसेविका उषा कळमकर म्हणाल्या.
मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी तसेच नितीन कुटे, प्रशांत कळमकर, प्रवीण मोहारे, रवींद्र कळमकर, राहुल मोहिते उपस्थित होते.
फोटो ओळ : वडगाव शेरीतील सुंदरबाई शाळेतील मुलांना सुरक्षा किटचे वाटप माजी नगरसेविका उषा कळमकर यांच्या हस्ते करण्यात आले.