शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीबाधितांना राज्यात 458 कोटी रूपयांचे वाटप; ८ लाख ५५ हजार २६६ लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 07:24 IST

खरीप हंगामासाठीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातून ८४ लाख शेतकऱ्यांनी सहभाग  घेतला.

पुणे : पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना ४५८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई आतापर्यंत देण्यात आली. ८ लाख ५५ हजार २६६ शेतकरी त्याचे लाभार्थी आहेत. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीने आपला या योजनेतील असहकार अजून सुरूच ठेवला असून त्यांनी अद्याप एकाही शेतकऱ्याला पैसे दिलेले नाहीत.

खरीप हंगामासाठीच्या पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातून ८४ लाख शेतकऱ्यांनी सहभाग  घेतला. त्याचे काही हजार कोटी रुपये केंद्र, राज्य सरकारने व शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत. जुलै, ऑगस्ट व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसात यंदाच्या खरीप हंगामात अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यापैकी ३८ लाख ८० हजार विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे दावे दाखल केले.

अन्य बाधित शेतकऱ्यांनाही लवकर भरपाई 

कृषी विभाग व कंपन्यांनी ३८ लाख ८० हजार शेतकऱ्यांसाठी १ हजार ३७३ कोटी १७ लाख रुपयांची नुकसान भरपाई निश्चित केली आहे. रिलायन्स वगळता अन्य ५ कंपन्यांनी आतापर्यंत साडेआठ लाख अर्जदार शेतकऱ्यांना ४५८ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. अन्य बाधित शेतकऱ्यांचे दावेही मंजूर असून नुकसान भरपाईचे पैसे लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा होतील. 

तक्रारीची दखल अद्याप नाहीच

भारतीय कृषी विमा, बजाज अलायन्स, एचडीएफसी, इफ्को टोकियो, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, आयसीआयसीआय लोम्बार्ड या ६ कंपन्यांची केंद्राने राज्यासाठी विमा कंपनी म्हणून नियुक्ती केली आहे. रिलायन्स वगळता सर्व कंपन्यांनी पैसे देण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या केंद्रीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे कृषी आयुक्तांनी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीबाबत लेखी तक्रार केली आहे, मात्र त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. 

टॅग्स :FarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र