शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंगवर मुदतबाह्य डाळींचे होतेय वितरण: एफडीओकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 14:03 IST

गव्हाचा दर्जादेखील खराब असल्याचे दुकानदारांचे म्हणणे

ठळक मुद्देकाही महिन्यांपासून शहरात शिधापत्रिकाधारकांना खराब धान्याचा पुरवठा शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला आम्हालाच जावे लागते सामोरे

पुणे : पाकिटावरील तारीख बदलून डाळी वितरित करण्यापाठोपाठ शिधापत्रिकाधारकांना मुदतबाह्य डाळींच्या पाकिटांचे वितरण केले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच, काही ठिकाणी डाळींचा दर्जा अत्यंत खराब आहे. गेले काही महिने सातत्याने खराब दर्जाच्या गव्हाचा पुरवठा होत असल्याचे काही दुकानदारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.काही महिन्यांपासून शहरात शिधापत्रिकाधारकांना खराब धान्याचा पुरवठा होत आहे. तसेच, तूरडाळ व हरभराडाळ दर महिन्याला मिळेलच, असेही नाही. याबाबत ग्राहकांनी दुकानदारांकडे विचारणा केली असता, अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून नियमित पुरवठाच केला जात नसल्याचे उत्तर मिळाले. याबाबत अधिकाऱ्यांना विचारल्यास ‘आम्हाला जसे धान्य मिळते तसाच धान्याचा पुरवठा केला जातो,’ असे उत्तर मिळत असल्याचे दुकानदारांनी सांगितले. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला आम्हालाच सामोरे जावे लागत असल्याचेही दुकानदारांनी स्पष्ट केले.  याबाबत ग्राहक संरक्षण सिमितीचे शहराध्यक्ष संदीप दारवटकर यांनी अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे (एफडीओ) तक्रार नोंदविली आहे. या महिन्यात पर्वती दर्शन येथील एका रास्त धान्य दुकानातून वितरित होणाऱ्या डाळीच्या पाकिटावर ४ एप्रिल २०१९ रोजी डाळ पॅकबंद केल्याचा उल्लेख आहे. तसेच, याच पाकिटावर सहा महिन्यांच्या आत वापर करणे चांगले, अशा आशयाचा मजकूर दिलेला आहे. जुलै २०१९मधे वितरित केलेल्या डाळीच्या पाकिटांवर छापलेल्या तारखेवर बदललेली तारीख छापली होती. त्या वेळी २०१८ या सालावर २०१९ सालाचा छाप उमटविण्यात आला होता. दर्जेदार धान्याचा पुरवठा करण्यात हयगय करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी दारवटकर यांनी केली आहे. .........दुकानदारांनी दर्जा खराब असल्याचे केले मान्य कोथरूडमधील एका रास्त धान्य दुकानदारांने डाळींचा दर्जा खराब असल्याचे मान्य केले. तसेच, काही महिन्यांपासून गहूदेखील खराब दर्जाचा येत असल्याचे त्यांनी सांगितले. .........खराब दर्जाच्या धान्याचा पुरवठा करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. .....

टॅग्स :Puneपुणे