बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानला पीपीई किटचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:10 IST2021-05-17T04:10:24+5:302021-05-17T04:10:24+5:30

पाबळ येथील व सध्या भोसरी येथे वास्तव्यास असलेल्या गायकवाड कुटुंबातून या संघटनेला तबब्बल पन्नास उच्च दर्जाचे किट देण्यात आली. ...

Distribution of PPE kits to Balutedar Kranti Pratishthan | बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानला पीपीई किटचे वाटप

बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानला पीपीई किटचे वाटप

पाबळ येथील व सध्या भोसरी येथे वास्तव्यास असलेल्या गायकवाड कुटुंबातून या संघटनेला तबब्बल पन्नास उच्च दर्जाचे किट देण्यात आली.

भोसरी येथील शिवाजीराव गायकवाड यांनी बलुतेदार क्रांती प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिकेसाठी मोठी आर्थिक मदत तीन वर्षापूर्वी केली होती. त्या पार्श्वभूमीवर संतोष शिवाजीराव गायकवाड यांनी उच्च प्रतीचे तब्बल पन्नास किट देऊन या कुटुंबाने संरक्षणाची सोय करून दिली. याबाबत प्रतिष्ठान कडून गायकवाड कुटुंबाचे आभार व्यक्त करण्यात आले. संघटनेचे संजय शेंबडे व भाऊ सुतार सध्या पाबळ परिसरात रुग्णवाहिका सेवा देत आहेत. हे

करत असताना कोरोना रुग्णांनाच्या मृत्यूनंतर त्यांच्या अडचणी असलेल्या कुटुंबाना मदत करत अंत्यविधीदेखील करत असून सामाजिक बांधिलकी जोपासत त्यांनी सुरू ठेवलेल्या मदत म्हणून गायकवाड कुटुंबाने ५० पीपीइ किट भेट दिले आहे. यापुढे ही मदत करणार असल्याचे शिवाजीभाऊ गायकवाड यांनी सांगितले.

फोटो : पाबळ येथे पीपीइ कीट देताना शिवाजीभाऊ गायकवाड.

Web Title: Distribution of PPE kits to Balutedar Kranti Pratishthan