साकुर्डेसह चार उपकेंद्रांत ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:13 IST2021-07-14T04:13:28+5:302021-07-14T04:13:28+5:30
या वेळी आरोग्य विस्तार अधिकारी बजरंग चोरमले, केंद्रप्रमुख अनिल जगदाळे, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल चाचर, पुरंदर शिक्षक ...

साकुर्डेसह चार उपकेंद्रांत ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप
या वेळी आरोग्य विस्तार अधिकारी बजरंग चोरमले, केंद्रप्रमुख अनिल जगदाळे, पुरंदर तालुका शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल चाचर, पुरंदर शिक्षक पतसंस्थेचे मानद सचिव गणेश कामठे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर, साकुर्डे उपकेंद्राच्या आशा वर्कर वनिता लोंढे, मदतनीस आशा भंडलकर, दीपाली चव्हाण आदी उपस्थित होते.
पुरंदर तालुका शिक्षक समिती सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवित असते, कोरोनाकाळातही शिक्षकांनी भरीव योगदान दिले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाकाळात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला होता. भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून शिक्षक समितीने पुढाकार घेऊन विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ही मदत गावोगावी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचे अनिल चाचर यांनी सांगितले.
शिक्षण समितीचे अध्यक्ष अनिल चाचर आणि पदाधिकारी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सातत्याने गावोगावी मदत करत असतात. आजपर्यंत त्यांनी शाळाबाह्य मुलांसाठी मोठे कार्य केले असून आजही त्यांचे कार्य अव्यहातपणे सुरू आहे. त्यांनी आज दिलेले हे दहा किलो क्षमतेची ऑक्सिजन मशीन गावातील सर्वसामान्य जनतेचे प्राण वाचविण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास बी. एम. काळे यांनी व्यक्त केला.
साकुर्डे उपकेंद्रात ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर मशीन प्रदान करताना मान्यवर.