कोविड सेंटरमधील रुग्णांना पौष्टिक आहार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:07+5:302021-05-14T04:10:07+5:30
या वेळी कोरोना संकटात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून व २४ तास कोरोना रुग्णांमध्ये राहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य ...

कोविड सेंटरमधील रुग्णांना पौष्टिक आहार वाटप
या वेळी कोरोना संकटात प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून व २४ तास कोरोना रुग्णांमध्ये राहून स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या कोविड सेंटरमधील परिचारिका, डॉक्टर,पोलीस अधिकारी,यांचा सत्कार करण्यात आला. निमगाव केतकी व वालचंदनगर येथील कोविड सेंटरमधील रुग्णांना सलग आठवडाभर पुरतील एवढे पौष्टिक आहार तहसीलदारांच्या हस्ते संबंधितांच्या ताब्यात देण्यात आला. या वेळी भाजप किसान मोर्चा सचिव माऊली चवरे, प्रभारी तहसीलदार अनिल ठोंबरे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील गावडे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी जाधव यांच्या बरोबर परिचारिका व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तर सूरज रासकर, सागर शेंडगे, सहदेव सरगर, रोहन पांढरे, पांडुरंग सूळ, शरद धांडोरे, सागर देवकाते, गणेश नरूटे आदींचे कार्यक्रमासाठी योगदान लाभले.
भाजप नेते गजानन वाकसे यांचा वाढदिवसानिमित्त कोविड सेंटर मधील रुग्णांना पौष्टिक आहार, फळेवाटप करण्यात आले.
१३०५२०२१ बारामती—०१