जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:09 IST2021-05-24T04:09:15+5:302021-05-24T04:09:15+5:30

कुकॉइन कंपनीच्या सहकार्याने व आदिम संस्था यांच्या स्थानिक संयोजनातून या साहित्यांचे वाटप करण्यात आले. घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस ...

Distribution of necessities | जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कुकॉइन कंपनीच्या सहकार्याने व आदिम संस्था यांच्या स्थानिक संयोजनातून या साहित्यांचे वाटप करण्यात आले.

घोडेगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, बी. डी. काळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. इंद्रजित जाधव यांच्या हस्ते वस्तूंचे वाटप केले. सुमारे २५ गावांतील भूमिहीन कुटुंबे व आदिम जमातीचे कातकरी आदिवासी कुटुंबे यांना हे साहित्य देण्यात आले. साहित्य उपलब्ध व्हावे यासाठी कुकॉइन कंपनीचे सतीश खंदारे, पंकज जाधव, मयूर चव्हाण यांनी पुढाकार घेतला. सामाजिक कार्यकर्ते शैलेश डिखळे, विनोद शेंडे, कृष्णा बाजारे, डॉ. अमोल वाघमारे यांनी समन्वयाचे काम केले, तर स्थानिक संयोजन आदिम संस्थेचे राजू घोडे, अशोक पेकारी, अविनाश गवारी, अशोक जोशी, दत्ता गिरंगे, अनिल सुपे यांनी केले.

२३ तळेघर

Web Title: Distribution of necessities