भोरमधील संपर्क तुटलेल्या गावांना केरोसीन वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:10 IST2021-07-28T04:10:58+5:302021-07-28T04:10:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क भोर : तालुक्यातील अतिदुर्गम पश्चिम भागातील पूर्णतः संपर्क तुटलेल्या व वीजपुरवठा खंडित झालेल्या १२ गावांना ...

Distribution of kerosene to the villages which lost contact in the morning | भोरमधील संपर्क तुटलेल्या गावांना केरोसीन वाटप

भोरमधील संपर्क तुटलेल्या गावांना केरोसीन वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क

भोर : तालुक्यातील अतिदुर्गम पश्चिम भागातील पूर्णतः संपर्क तुटलेल्या व वीजपुरवठा खंडित झालेल्या १२ गावांना मंगळवारी (दि. २७) महसूल प्रशासनातर्फे तातडीची मदत म्हणून प्रतिकुटुंब आवश्यक केरोसीनचा पुरवठा करण्यात आल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.

मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण

भागातील विजेचे पोल पडून वीजपुरवठा खंडित झालेल्या

व रस्ता बंद झालेल्या १२ गावांतील नागरिकांना केरोसीन डीलर साईनाथ बागडे यांच्या एजन्सीमार्फत ६०० लिटर केरोसीनचा पुरवठा एकूण ५६४ कुटुंबांना प्रतिएक लिटरप्रमाणे वाटप करण्यात आला. कारुंगण २७ लीटर, वारवंड (४०), शिरगाव (६७), दुर्गाडी (७०), अभेपुरी (३५), उंबारर्डे (३०), अशिंपी (३६), शिळिब (७८), राजीवडी (२४), कुंड (३२), कुंडली ब्रुद्रक (६३), कुंडली खुर्द (६२) याप्रमाणे प्रत्येक गावात केरोसेनचे वाटप करण्यात आले.

फोटो : केरोसिन वाटप करताना महसूल विभागाचे कर्मचारी.

Web Title: Distribution of kerosene to the villages which lost contact in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.