शिवे येथे किराणा साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST2021-05-30T04:10:32+5:302021-05-30T04:10:32+5:30

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर यांनी या दिलेल्या वस्तूंमुळे ग्रामस्थ समाधानी असल्याची भावना व्यक्त केली, तसेच गतवर्षीही याप्रमाणेच केलेल्या मदतीचा ...

Distribution of groceries at Shive | शिवे येथे किराणा साहित्य वाटप

शिवे येथे किराणा साहित्य वाटप

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर शिवेकर यांनी या दिलेल्या वस्तूंमुळे ग्रामस्थ समाधानी असल्याची भावना व्यक्त केली, तसेच गतवर्षीही याप्रमाणेच केलेल्या मदतीचा चांगला उपयोग झाल्याचे सांगितले. मनशक्तीचे प्रतिनिधी अजित फापाळे यांनी केंद्रांच्या कोरोना काळातील कार्याची माहीती सांगून, आपल्यातील दानशूरांनीही अशा वाटा उचलावा, अशी विनंती केली. या प्रसंगी पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके, चेअरमन काळूराम शिवेकर, ग्रामपंचायत सदस्य अक्षय शिवेकर, आनंद साकोरे, बेबीताई बारवेकर, सुमित्रा शिवेकर, रघुनाथ शिवेकर, यशवंता शिवेकर, लहु सातपुते, शिवाजी शिवेकर, सुमन गडदे, उज्वला शिवेकर, गौरी वैद्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

याकामी ग्रामसेविका सविता बोरकर, कु.अथर्व शिवेकर, दिनेश जाधव यांचे सहकार्य लाभले.

शिवे येथे गरजूंना धान्य वाटप करताना मान्यवर

Web Title: Distribution of groceries at Shive