राजगड कारखान्यातून इथेनॉलच्या वितरणास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:08 IST2021-02-05T05:08:21+5:302021-02-05T05:08:21+5:30
राजगड कारखान्याचे संस्थापक अनंतराव थोपटे यांच्या हस्ते आणि कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत ...

राजगड कारखान्यातून इथेनॉलच्या वितरणास सुरुवात
राजगड कारखान्याचे संस्थापक अनंतराव थोपटे यांच्या हस्ते आणि कारखान्याचे अध्यक्ष आमदार संग्राम थोपटे व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत इथेनॉलच्या पहिल्या टँकरचे विधीवत पूजन करून इथेनॉल वितरणास सुरूवात करण्यात आली. यावेळी राजगड कारखान्याचे उपाध्यक्ष विकासरावं कोंडे, कृष्णाजी शिंगारे, शैलेश सोनवणे,के डी सोनवणे,चंद्रकांत कोंडे,कार्यकारी संचालक सुनील महिंद आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारने इथेनॉलबाबत घेतलेले निर्णय व इथेनॉलला मिळणारा दर लक्षात घेऊन राजगड सहकारी साखर कारखान्याने बी हेवी मोलॅसिस सांगली येथील वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना लि. यांना देऊन तेथूनच अल्कोहोल राजगड कारखान्याच्या साईटवर आणून इथेनॉलनिर्मिती केली जात आहे.या चालू हंगाम २०२०-२१ मध्ये एक कोटी लीटर इथेनॉल उत्पादन तयार करण्याचे ठरविले. त्यानुसार भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम व इंडियन ऑईल या तेल कंपन्यांशी करार करून त्यांच्या मागणीनुसार या कंपन्यांना पुरवठा केला जाणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष संग्राम थोपटे यांनी सांगितले.
२९नसरापूर
इथेनॉलच्या पहिल्या टॅंकरचे पूजनप्रसंगी उपस्थित असलेले अनंतराव थोपटे, संग्राम थाेपटे व इतर.