जाधव दाम्पत्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:21 IST2021-02-21T04:21:15+5:302021-02-21T04:21:15+5:30
या विद्यालयात मिळालेल्या संस्कारामुळेच घडलो, असे नीलेश जाधव म्हणाले. जाधव दाम्पत्याने विद्यालयास कपाट व शैक्षणिक फी भरल्याबद्दल प्राचार्य सुनील ...

जाधव दाम्पत्याकडून शैक्षणिक साहित्य वाटप
या विद्यालयात मिळालेल्या संस्कारामुळेच घडलो, असे नीलेश जाधव म्हणाले. जाधव दाम्पत्याने विद्यालयास कपाट व शैक्षणिक फी भरल्याबद्दल प्राचार्य सुनील कदम यांनी अभिनंदन केले. शैक्षणिक साहित्य मिळविण्यासाठी ज्येष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी विशेष प्रयत्न केले. सहकार्य ज्येष्ठ सेवक रमेश जावळकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख शशिकांत जाधव यांनी केले. प्रास्ताविक पर्यवेक्षक म्हाळसाकांत खेडेकर यांनी केले. सूत्रसंचालन दिव्या थोपटे हिने केले.
यावेळी शिवजयंत्तीनिमित्त प्रज्ञेश साळवे,हर्षल शिंदे,अनुष्का थोपटे,जान्हवी जावळकर,समृद्धी थोपटे,अस्मिता जावळकर,वैभवी जावळकर,सृष्टी पवार,श्रृती पवार,अविष्कार पासलकर,वैष्णवी सुर्वे,अरूणा ढेबे या विद्यार्थ्यांनी तसेच प्राचार्य सुनील कदम,सचिन विटेकर आणि रेश्मा यादव या शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले.तसेच गुरूशिष्य कलाविष्कार चित्र प्रदर्शनासाठी निवड झालेले विद्यार्थी ऋचिता जाधव,नयना अलकुंटे,समृद्धी थोपटे आणि चित्रकला शिक्षिका अर्पणा वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी माजी सरपंच शरद जावळकर,रूपेश साळवे,नंदूशेठ जावळकर,बाळासाहेब जावळकर,आर.जी.यादव,चंद्रकांत यादव,साधना यादव तसेच शिक्षक-शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-प्रयोगशाळेसाठी कपाटाच्या चाव्या भेट देताना सरपंच रूपालीताई जाधव आणि नीलेश जाधव