ऊसतोड कामगरांना ब्लॅंकेट वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:05 IST2021-02-05T05:05:54+5:302021-02-05T05:05:54+5:30

इफ्को कंपनीचे एमडी डॉ. यू. एस. अवस्थी यांचे संकल्पनेतून हिवाळ्यात उपयुक्त असे ब्लँकेट वाटप करण्यात आले. भीमाशंकर सह. साखर ...

Distribution of blankets to sugarcane workers | ऊसतोड कामगरांना ब्लॅंकेट वाटप

ऊसतोड कामगरांना ब्लॅंकेट वाटप

इफ्को कंपनीचे एमडी डॉ. यू. एस. अवस्थी यांचे संकल्पनेतून हिवाळ्यात उपयुक्त असे ब्लँकेट वाटप करण्यात आले. भीमाशंकर सह. साखर कारखाना लि. दत्तात्रयनगर पारगाव यांच्या ऊसतोडणी कामगार व गरीब, गरजू ५० कुटुंबांना अवसरी खु. येथे ब्लँकेट वाटप करण्यात आले. या वेळी धनंजय जामदार, खरेदी -विक्री संघाचे अध्यक्ष भगवानराव वाघ, उपाध्यक्ष रामनाथ बांगर, संघाचे संचालक संजय गोरे,नाथा घेवडे पा.,संतोष बारवे, माजी सभापती आनंदराव शिंदे, उपसभापती संतोष भोर, राजू भोर,धनंजय ठुमणे,संतोष साबळे, बाळासाहेब शिंदे, परमानंद शिंदे व इतर ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.ऊस तोडणी कामगार हे त्यांचे गाव, कुटुंब सोडून आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कुटुंब घेऊन दर वर्षी कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी येतात. दिवसभर प्रामाणिकपणे काम करून आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी दोन पैसे शिल्लक राहावेत यासाठी काबाड कष्ट करतात. इफ्कोने अशा गरीब जनतेसाठी वेळोवेळी उपक्रम राबवावेत, असे आनंदराव शिंदे म्हणाले. या कार्यक्रमात इफ्कोचे क्षेत्रीय व्यवस्थापक धनंजय जामदार यांनी इफको कंपनी बाबत माहीती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे व्यवस्थापक गणेश हुले यांनी केले. तर राजू भोर यांनी आभार मानले.

Web Title: Distribution of blankets to sugarcane workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.