मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ब्लॅंकेट वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:32 IST2021-01-08T04:32:36+5:302021-01-08T04:32:36+5:30
------- ९१ सायकलपटूंचा १४०० वेळा टेकडीवर चढाईचा विक्रम पुणे : रायडर्स ग्रुपचा सायकल चालवा या उपक्रमांतर्गत ९१ सायकलपटूंनी ठराविक ...

मीनाताई ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ब्लॅंकेट वाटप
-------
९१ सायकलपटूंचा १४०० वेळा टेकडीवर चढाईचा विक्रम
पुणे : रायडर्स ग्रुपचा सायकल चालवा या उपक्रमांतर्गत ९१ सायकलपटूंनी ठराविक कालावधीत १४०० वेळा टेकडी चढण्याचा यशस्वी विक्रम केला आहे. आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन केले. ग्रुपचे सुभाष कोकणे, किरण कालशेट्टी, संजय सूर्यवंशी, शिशुपाल तोमर, चेतन विभूते उपस्थित होते.
----
महाराष्ट्र इंटकच्या मंत्रालयावर मोर्चा
पुणे : कामगार व शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी राज्यशासनाकडे मागणी केली आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रालयावर मोर्चा काढणार आहे, अशी महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली. केंद्राने कायदे केल्यामुळे राज्यामधील अनेक उद्योग-व्यवसायांमध्ये मालकांनी कामगारांना काढून टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. याची महाराष्ट्र कामगार मंत्रालयाने दखल घेणे गरजेचे आहे, अशी मागणी राज्य कार्यकारिणी बैठकीत एकमुखाने केली आहे. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेण्याचे आश्वासनही दिले आहे.