चंदन, गुळवेलीच्या ७५ हजार रोपांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:24 IST2021-09-02T04:24:30+5:302021-09-02T04:24:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुष मंत्रालय पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्राच्या ...

चंदन, गुळवेलीच्या ७५ हजार रोपांचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आयुष मंत्रालय पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्राच्या वतीने ७५ हजार औषधी वनस्पतींचे वाटपाचा आरंभ करण्यात आला. शिरूर येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय येथे ‘आझादी का अमृत महोत्सव’ या संकल्पनेअंतर्गत हा उपक्रम पार पडला.
राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ व सुविधा केंद्राच्या वतीने औषधी वनस्पती वाटप राष्ट्रीय उपक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते झाले. या वेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, विद्यापीठाच्या वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अविनाश आडे, आयुष मंत्रालायच्या सी.सी.आर.यू.एस. येथील डेप्युटी जनरल डॉ. असीम अली खान व डॉ.विजयकुमार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात आयुष मंत्रालयातील उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर सानवाल व सुविधा केंद्राचे प्रमुख संशोधक व विभागीय संचालक प्रा. डॉ. दिगंबर मोकाट यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी ७५ शेतकऱ्यांना प्रत्येकी १०० याप्रमाणे साडेसात हजार चंदन व गुळवेल रोपांचे वाटप करण्यात आले. शेतकरी राजेंद्र गाडेकर व पांडुरंग वाठारकर आदी या वेळी उपस्थित होते.
चौकट
“भारताने जगाला योग व आयुर्वेद या दोन गोष्टी दिल्या आहेत. या माध्यमातून औषधी वनस्पतींची लागवड वाढून आयुर्वेदाचा प्रसार होण्यास मदत होईल.”
- प्रा. डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ