पाच शाळांना 267 टॅब चे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:25 IST2021-01-13T04:25:27+5:302021-01-13T04:25:27+5:30

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील औषधाच्या निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या सिप्ला कंपनीच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या सिप्ला फाउंडेशनच्या वतीने दौंड तालुक्यातील ...

Distribution of 267 tabs to five schools | पाच शाळांना 267 टॅब चे वितरण

पाच शाळांना 267 टॅब चे वितरण

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील औषधाच्या निर्मितीत अग्रेसर असणाऱ्या सिप्ला कंपनीच्या माध्यमातुन उभारण्यात आलेल्या सिप्ला फाउंडेशनच्या वतीने दौंड तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यमातुन अभ्यास करता यावा या उद्देशाने पाच शाळांना 267 टॅब चे वाटप करण्यात आले.

कोरोना काळात आणी तद्नंतर देखील ग्रामीण रुग्णालय,शाळा,महाविद्यालय अश्या विविध क्षेत्रात अत्यंत गरजेचे वस्तूचे वाटप आजवर सिप्ला फाउंडेशनच्या वतीने देण्यात आले आहे.नुकतेच दौंड येथे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंच,रावणगाव व कुरकुंभ येथील प्राथमीक रुग्णालयाला विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी सिप्ला कंपनीचे प्रमुख व्यवस्थापन अधिकारी शशी भुषण सिंग,विभागीय प्रकल्प अधिकारी मंगेश वझे,संजय बेरड,विकास शिंदे इत्यादी उपस्थीत होते.

चाळीस लाख रुपये खर्च करुन सिप्ला फाउंडेशनने दौंड तालुक्यातील श्रीयोग माध्यमिक विद्यालय बेटवाडी,श्री गुप्तेश्वर माध्यमीक आश्रमशाळा,जनता विद्यालय दौंड,श्रीमती लाजवंती गॅरेला हायस्कुल दौंड,ऐन टी माध्यमीक आश्रमशाळा सोनवडी या ठिकाणी नुकतेच ई लर्निंगसाठी २६७ टॅब,सेठ ज्योतिप्रसाद विद्यालायला बेंचेस,कुरकुंभ व रावणगाव प्राथमीक आरोग्य केंद्राला वैद्यकीय उपयोगातील विविध साहित्याचे वाटप केले आहे.यापुढे ही गरजेनुसार ग्रामीण भागात हे कार्य सिप्ला फाउंडेशन सुरू ठेवणार आहे.

शशी भुषण सिंग,प्रमुख व्यवस्थापन अधिकारी सिप्ला.

सिप्ला फाउंडेशनच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना ई-लर्निंग टॅबचे वाटप करताना सिप्ला चे अधिकारी शशी भुषण सिंग

Attachments area

Web Title: Distribution of 267 tabs to five schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.