माझी वसुंधरा अभियानार्तगत २ हजार झाडांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:25+5:302021-02-23T04:16:25+5:30

भोर नगरपलिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानार्तगत ई शपथ, झाडे लावा झाडे जगवा याबाबत जनजागृती आणि हळदी कुंकू समारंभ तसेच ...

Distribution of 2,000 trees under my Vasundhara Abhiyan | माझी वसुंधरा अभियानार्तगत २ हजार झाडांचे वाटप

माझी वसुंधरा अभियानार्तगत २ हजार झाडांचे वाटप

भोर नगरपलिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानार्तगत ई शपथ, झाडे लावा झाडे जगवा याबाबत जनजागृती आणि हळदी कुंकू समारंभ तसेच महिलांना सुमारे २ हजार फुलझाडांचे वाटप करण्यात आले.

भोर नगरपलिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजीमहाराज सभागृहात छत्रपती शिवाजीमहाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून राजगड ज्ञानपीठाच्या विश्वस्त स्वरूपा थोपटे होत्या. यावेळी नगराध्यक्षा निर्मला आवारे,गितांजली शेटे, माजी नगराध्यक्षा तृप्ती किरवे,नगरसेविका वृषाली घोरपडे, पद्मिनी तारू, आशा रोमण,रुपाली कांबळे,अमृता बहिरट सोनम मोहिते,स्नेहा पवार,आशा शिंदे,पल्लवी सागळे व महिला तसेच नगरपलिकेचे कर्मचारी उपस्थित होत्या.

यावेळी महिलांना माझी वसुंधरा अभियानाची शपथ घेण्यात आली, तर प्रमुख पाहुण्या स्वरुपा थोपटे यांच्या हस्ते महिलांना गुलाब आणि मोगरा फुलझाडांच्या सुमारे २ हजार रोपांचे वाटप करण्यात आले. वसुंधरेचे रक्षण करणे आणि झाडे जगवण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी बोलताना नगराध्यक्षा निर्मला आवारे म्हणाल्या, की भोर नगरपलिकेच्या वतीने महिलांना सुमारे २ हजार गुलाब व मोगरा या रोपांचे वाटप करण्यात आले.सदरची झाडे लावावी, जगवावी आणि अभियान यशस्वी करण्यात मदत करावी. स्वरुपा थोपटे म्हणाल्या, की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे लावणे आणि ती जगवणे गरजेचे असून भोर नगरपलिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानार्तगत हेच काम सुरु आहे. यात सर्वानी सहभाग घ्यावा.

भोर नगरपलिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्वरूपा थोपटे, निर्मला आवारे व इतर.

Web Title: Distribution of 2,000 trees under my Vasundhara Abhiyan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.