एक हात मदतीचा अंतर्गत हजार कुटुंबांना राशन वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:35+5:302021-06-09T04:13:35+5:30
यावेळी आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, जो माणूस आपल्या अडचणीच्या काळात उभा राहतो, पुढील काळात आपण त्याच्या पाठीशी सदैव ...

एक हात मदतीचा अंतर्गत हजार कुटुंबांना राशन वाटप
यावेळी आमदार दिलीप मोहिते म्हणाले की, जो माणूस आपल्या अडचणीच्या काळात उभा राहतो, पुढील काळात आपण त्याच्या पाठीशी सदैव राहू. कोरोना महामारी संकटामुळे अनेकांना आपले उद्योग-व्यवसाय बंद ठेवण्याची पाळी आल्याने व संक्रमण रोखण्यासाठी लावण्यात आलेली टाळेबंदी यामुळे गरीब कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. हाताला काम नसल्याने अनेक गरीब कुटुंबांच्या चुली कशा पेटतील, हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला असताना पै.गणेश बोत्रे यूथ फाउंडेशन यांनी राबविलेला हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आणि माणुसकीचे दर्शन घडविणारा आहे. साधारण वीस ते तीस दिवस पुरेल एवढे अन्न पॅक करून ते गरीब कुटुंबांपर्यंत पोहोचविले.
कोरोनाने लोकांचे हात थांबल्याने त्यांची होणारी परवड या मदतीने काहीप्रमाणात का होईना थांबली आहे.