शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरातील ‘कोविड केअर सेंटर्स’मधील असुविधांवरून मुख्यसभेत सभासदांकडून प्रशासन धारेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 21:49 IST

कोविडच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये

ठळक मुद्देनगरसेवकांचे म्हणणे ऐकून गांभीर्याने उपाययोजना करण्याच्या महापौरांच्या सूचना

पुणे : शहराच्या मध्यवस्तीतील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना उपनगरांमध्ये का करीत नाहीत. कोविड केअर सेंटर्समध्ये पाणी नाही, स्वच्छतेचा प्रश्न आहेत. अधिकारी फक्त फोटोसेशनसाठी येतात का असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरण्याचा प्रयत्न मंगळवारच्या मुख्यसभेमध्ये केला.नगरसेवक योगेश ससाणे यांनी हडपसर मध्ये 2200 रुग्ण झाले असून तीन विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी एका सेंटरवर कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. परंतु, अद्याव एकही वरिष्ठ अधिकारी तिकडे फिरकला नाही. हडपसर नक्की पुण्यातच आहे ना? असा प्रश्न ससाणे यांनी व्यक्त केला.तर अविनाश बागवे यांनी खासगी रुग्णालयांच्या मनमानी बिल आकारणीकडे लक्ष वेधले. खासगी रुग्णालये रुग्णांकडून पैसे उकळत आहेत. त्यांच्यावर प्रशासन काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला.डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले, राज्य सरकारने पाठविलेल्या परिपत्रकाचा दाखला देत सात ते आठ हजार रुपये रुग्णालयांकडून वसूल केले जात आहेत. हे परिपत्रक रद्द करण्याची शिफारस पालिकेने करावी.ऑनलाईन सहभागी झालेले भाजपाचे नगरसेवक श्रीनाथ भिमाले म्हणाले, कोविडच्या प्रश्नावर कोणीही राजकारण करू नये. महापौर प्रशासनाला योग्य त्या सूचना देतील आणि समस्यांमधून मार्ग काढतील.महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नगरसेवकांच्या समस्या समजावून घेत प्रशासनाला गांभीयार्ने काम करायच्या सूचना केल्या. सभासदांचे म्हणणे वास्तव आहे. नागरिकांची परवड होत आहे. त्यांना त्रास होतोय. लोकांचा नगरसेवकांशी थेट संपर्क असल्याने लोक त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडतात. नगरसेवकांनी सूचना लेखी स्वरूपात द्याव्यात. प्रशासनाची नागरिकांशी समन्वय साधण्याची यंत्रणा अपुरी आहे. प्रशासनाने स्वाब तपासणी, विलगीकरण बेड, बिले याबाबत खूप प्रश्न आहेत. त्यावर गांभीर्याने मार्ग काढा. अधिकाऱ्यांनी नगरसेवकांचे फोन घ्यावेत. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जावे. कोविड केअर सेंटर्सवर असलेल्या समस्यांबाबत अतिरिक्त आयुक्तांसोबत बैठक घेऊन मार्ग काढू असे महापौर म्हणाले. शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वजण जनतेमध्ये जाऊन काम करताहेत. सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन महापौरांनी केले.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाMayorमहापौरcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त