शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे पोलीस दलात बदल्यांवरून 'नाराजीनाट्य'; आयुक्तांकडे दाद मागण्यासाठी कर्मचाऱ्यांची रांग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2020 21:40 IST

शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या.

ठळक मुद्देइतक्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी थेट आयुक्तांसमोर आल्याने एकच चर्चेचा विषय

पुणे : नवनियुक्त पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शनिवारी १२८९ पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले होते. मात्र त्यामध्ये मुदतपूर्व बदली व प्रशासकीय बदली झालेल्या काही नाराज पोलीस कर्मचाऱ्यांनी आपली बदली रद्द व्हावी, यासाठी सोमवारी पोलीस आयुक्तालयात एकच गर्दी केली होती. शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांनी दाद मागण्यासाठी अर्ज घेऊन पोलीस आयुक्तांच्या केबीनबाहेर रांगा लावल्या. कित्येक वर्षानंतर अशाप्रकारे इतक्या मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी थेट आयुक्तांसमोर आल्याने एकच चर्चेचा विषय झाला आहे. पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय, पोलीस आयुक्तालय व अन्य विभागांमध्ये ६ वर्षांपेक्षा जास्त काळ नोकरी करणाऱ्या पोलिसांची, तसेच विनंती अर्ज व ज्यांच्याबाबत तक्रारी आहेत, अशा पोलिसांच्या पोलीस प्रशासनाकडून बदल्या केल्या जातात. गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर १२८९ पोलिसांच्या बदल्यांचा आदेश काढला. या बदल्यामध्ये पोलीस हवालदार ४७६, सहायक फौजदार ६२, पोलीस नाईक ३२३, पोलीस शिपाई ४०८ यांचा समावेश आहे. मुदतपूर्व व प्रशासकीय बदली झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ही बदली रद्द करावी, यासाठी सोमवारी सकाळपासून पोलीस आयुक्तालयात एकच गर्दी केली होती. या सर्वांचे म्हणणे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे आणि अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी ऐकून घेतले. त्यात प्रामुख्याने अनेकांनी बदलीचे ठिकाण लांब आहे. वैद्यकीय कारणामुळे बदलीच्या ठिकाणी हजर होणे गैरसोयीचे असल्याची कारणे सांगितली. मंगळवारीही काही कर्मचारी येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.़़़़़़़़़या नियमानुसारच बदल्या करण्यात आलेल्या आहेत़ त्यापैकी काही जण नाराज असणार आहेत. काहीचे डिफॉल्ट रिपोर्ट नुसार बदली झाली आहे. ज्या पोलिसांचे खरेच महत्वाचे कारण आहे. त्यांचा विचार केला जाईल.  त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. अन्यथा इतरांना बदलीच्या ठिकाणी जावेच लागेल.  अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे़.  

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसcommissionerआयुक्तTransferबदली