शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी शिष्यवृत्तीची यादी रद्द करा, विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार न्याय देण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 03:30 IST

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र या योजनेचा मंत्री आणि सचिव दर्जाच्या मुलांनाच लाभ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे.

पुणे : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी राजर्षी शाहूमहाराज शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे; मात्र या योजनेचा मंत्री आणि सचिव दर्जाच्या मुलांनाच लाभ देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट आहे. त्यामुळेच ४ सप्टेंबर रोजी जाहीर झालेली निवड यादी व शासन निर्णय रद्द करून दोषींवर कारवाईकरावी; तसेच गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.सामाजिक न्याय विभागाने ३५ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली आहे. या विद्यार्थ्यांचा क्युएस वर्ल्ड रँकिंग क्र. २० ते १४० मधील आहे. ज्या विद्यार्थ्यांचा क्युएस वर्ल्ड रँकिंग क्र. १ ते १९ मधील आहे, अशा विद्यार्थ्यांचा समावेश पहिल्या ३५ जणांच्या यादीत केला नसल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले व सचिव दिनेश वाघमारे यांनी स्वत:च्या पदाचा व सत्तेचा गैरवापर करून, ३५ लाभार्थींची यादी जाहीर केली आहे. गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना डावलण्यात आल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला आहे.परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीसाठी कला शाखेच्या मुलांनीही अर्ज केले होते; मात्र ऐनवेळी जीआरमध्ये बदल करून, कला शाखेच्या पदव्युत्तर स्तरावरील विद्यार्थ्यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे या शाखेच्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, गुणवत्ता असतानाही आणि नियमात या अभ्यासक्रमाचा उल्लेख असताना, तो जीआर बदलून वगळण्यात आल्याने अनेकांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न भंगले आहे.- प्रतिमा पडघन, विद्यार्थिनीवैद्यकीय विभागाच्या विद्यार्थ्यांनाही विविध कोर्ससाठी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची तरतूद राजर्षी शाहूमहाराज परदेशी शिक्षण योजनेत आहे; मात्र आम्हाला मेडिकलमध्ये केवळ एमबीए आणि एमडीच्या कोर्ससाठीच शिष्यवृत्ती दिली जाईल, असे ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले; तसेच कोणतेही अधिकारी याबाबत नीट उत्तरे देत नसून, केवळ उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. आम्ही मुख्य सचिवांनादेखील याबाबत निवेदन दिले असून, त्यांनी याबाबत माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे, आमची रँकिंग १०० पेक्षा कमी असूनही निवड झालेली नाही. त्यामुळे कोणता निकष यासाठी लावण्यात आला, हे समजत नाही.- डॉ. तेजश्री एटम, विद्यार्थिनीआम्ही इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. करण्यासाठी अर्ज केला होता; मात्र पदव्युत्तर शिक्षण ज्यांनी परदेशात घेतले आहे, अशा विद्यार्थ्यांना या वर्षी वगळण्यात आल्याने आम्हाला पीएच.डी. करण्याचा मार्गच बंद झाला आहे. आधीच्या जीआरमध्ये अशी अट नव्हती. ती नव्याने घालण्यात आली आहे. त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.- शीलराज कोल्हे, आदिनाथ घाडगे, विद्यार्थी

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसStudentविद्यार्थीPuneपुणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार