कोथरूडमध्ये वाहनांची तोडफोड
By Admin | Updated: October 26, 2014 00:13 IST2014-10-26T00:13:18+5:302014-10-26T00:13:18+5:30
पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारण्यासाठी त्याच्या घरी गेलेल्या टोळक्याने परिसरातील वाहनांची मोठय़ा प्रमाणावर तोडफोड केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली.

कोथरूडमध्ये वाहनांची तोडफोड
पुणो : पूर्ववैमनस्यातून तरुणाला मारण्यासाठी त्याच्या घरी गेलेल्या टोळक्याने परिसरातील वाहनांची मोठय़ा प्रमाणावर तोडफोड केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
नितीन मालपोटे (वय 22, रा. एडीए ग्राउंडशेजारी, नवे शिवणो) याच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवाजी पडवळ (वय 28, रा. कोथरूड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिनकर कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मालपोटे त्याच्या साथीदारांसोबत गुरुवारी रात्री पडवळच्या सुतारद:यातील घरी गेला होता. पडवळ आणि मालपोटे यांची जुनी भांडणो आहेत. त्या भांडणाच्या रागामधून तो पडवळ यांना मारण्यासाठी गेला होता. त्या वेळी आरोपींनी पडवळ यांच्या घराच्या खिडकीवर विटा मारून काचा फोडल्या.
त्यानंतर घरात घुसून पडवळ व त्यांच्या आई-वडिलांना बेदम मारहाण केली. आरोपींनी जाताना परिसरामध्ये उभ्या असलेल्या एका स्कूल बससह 8 मोटारी व 3 रिक्षांची तोडफोड केली. या घटनेमागे पूर्ववैमनस्य हे एकमेव कारण आहे की त्याला राजकीय पाश्र्वभूमी आहे याचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)