नगरसेवकाची कारागृहात रवानगी

By Admin | Updated: April 13, 2017 03:55 IST2017-04-13T03:55:27+5:302017-04-13T03:55:27+5:30

वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक अमोल बालवडकर (रा. बालेवाडी) यांना अटक करून

Dispatch of corporator's prison | नगरसेवकाची कारागृहात रवानगी

नगरसेवकाची कारागृहात रवानगी

पुणे : वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक अमोल बालवडकर (रा. बालेवाडी) यांना अटक करून बुधवारी न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यांचा जामीन अर्जही फेटाळण्यात आल्याने त्यांंंची रवानगी येरवडा कारागृहात झाली. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. भंडरवार यांच्या न्यायालयाने हा आदेश दिला. त्यांच्या जामीन अर्जावर गुरुवारी सुनावणी होणार आहे़ सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एखाद्या नगरसेवकाची कारागृहात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे़
शिवाजीनगर पोलिसांनी बुधवारी दुपारी बालवडकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले़ अधिक तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली़ न्यायालयाने न्यायालयीन कोठडी मंजूर केली़ त्यानंतर बालवडकर यांच्या वतीने जामीन अर्ज करण्यात आला़ त्याला सरकारी वकील एस़ सी़ शिंदे यांनी विरोध केला़ बालवडकर हे नगरसेवक आहेत़ त्यांनी पदाचा गैरवापर करून पोलिसांवर दबाव आणून सरकारी कामात अडथळा आणला़ फिर्यादी दारू प्यायले असल्याचा आरोप करून त्यांची ब्रेथ अ‍ॅनालायझरवर टेस्ट करायला भाग पाडले़ वरिष्ठांकडे खोटी तक्रार केली़ नगरसेवक असलेल्या व्यक्तीकडून असे कृत्य अपेक्षित नाही, असा युक्तीवाद शिंदे यांनी केला़ तो ग्राह्य धरून न्यायालयाने बालवडकर यांचा जामीन अर्ज फेटाळला़
पोलीस निरिक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले, की बालवडकर यांना दुपारी दीडच्या सुमारास अटक करण्यात आली.

नो पार्किंगमध्ये कार लावल्याने वाद
जंगलीमहाराज रस्त्यावर वाहतूक पोलिसांची नो-पार्किंग आणि नो हॉल्टिंगबाबत विशेष कारवाई सुरू होती. त्यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांचा कारचालक गणेश चौधरी नो पार्किंगमध्ये कार उभी करून आतमध्ये मोबाइलवर खेळत बसला होता. डामसे यांनी चालकाला कार काढण्यास सांगितले. मात्र त्याने पोलिसांबरोबर वादावादी केल्यामुळे कारला जॅमर लावण्यात आला. डामसे पुढील चौकात गेले असता बालवडकर यांनी पदाचा गैरवापर करत कारवाई करू नका, तुम्हाला पाहून घेतो, अशी धमकी देत सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला़ त्यावरून बालवडकर आणि गणेश चौधरीविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता़

Web Title: Dispatch of corporator's prison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.