अंथुर्णेत विसावली पालखी

By Admin | Updated: July 19, 2015 03:43 IST2015-07-19T03:43:32+5:302015-07-19T03:43:32+5:30

येथे संत तुकाराममहाराज पालखी सोहळा सायंकाळी विसावला. या वेळी पालखी सोहळ्याचे रांगोळीच्या पायघड्या घालून गुढ्या उभारून स्वागत करण्यात आले.

Dishwarya Vishaval Palkhi | अंथुर्णेत विसावली पालखी

अंथुर्णेत विसावली पालखी

अंथुर्णे : येथे संत तुकाराममहाराज पालखी सोहळा सायंकाळी विसावला. या वेळी पालखी सोहळ्याचे रांगोळीच्या पायघड्या घालून गुढ्या उभारून स्वागत करण्यात आले. आमदार दत्तात्रय भरणे यांनी पालखीरथाचे सारथ्य केले.
बेलवाडी येथील अश्व रिंगणानंतर दुपारी एक वाजता लासुर्णे, जंक्शन येथील विसावा घेऊन सायंकाळी पाच वाजता पोहोचला.
या वेळी गावाच्या वेशीपासूनच आमदार भरणे यांनी रथाचे सारथ्य केले. गावात सोहळा पोहोचल्यानंतर भरणे यांच्यासह सरपंच नानासो पाटील गटविकास अधिकारी डॉ. लहूजी वडापुरे, तलाठी बी. डी. दराडे, ग्रामसेवक पोटफोडे, युवराज म्हस्के, अ‍ॅड. प्रमोद खरात, तानाजी शिंदे, अंकुश खरात, लाला खरात, मुख्याध्यापक भिवाजी शिंदे, विशाल साबळे, दत्तात्रय गायकवाड, अनूप साबळे, राहुल साबळे आदींनी सोहळ्याचे स्वागत केले. त्यानंतर पालखी सोहळा मैदानात विसावला. छत्रपती हायस्कूलच्या मुलींच्या लेझीम पथकाने या वेळी सोहळ्याचे स्वागत केले. (वार्ताहर)

Web Title: Dishwarya Vishaval Palkhi