उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
By Admin | Updated: February 22, 2015 01:40 IST2015-02-22T01:40:06+5:302015-02-22T01:40:06+5:30
कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी पुरोगामी कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली
पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी पकडले जावेत, यासाठी पुरोगामी कार्यकर्त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्त्या तरुणांची शनिवारी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हे आंदोलन असेच सुरू राहिले तर, त्यातील दोघांची किडनी निकामी होण्याची शक्यता आहे.
पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून राजन दांडेकर, हनुमंत पवार, अश्विनी सातव-डोके व हर्षल लोहकरे या चौघांनी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पानसरे व दाभोलकर प्रकरणातील आरोपी पकडले जावेत, तसेच या मागे असणाऱ्या शक्तीचा शोध घ्यावा, अशी मागणी उपोषणकर्त्यांची आहे.
पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. तसेच उपोषणकर्त्यांची मागण्या मुख्यमंत्र्यांच्या कानी घालू असे सांगत साखळी उपोषण करा, असा सल्लाही त्यांनी दिला. (प्रतिनिधी)