शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
By Admin | Updated: January 14, 2017 02:43 IST2017-01-14T02:43:52+5:302017-01-14T02:43:52+5:30
मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांबरोबर

शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा
वडगाव मावळ : मावळ तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या बैठकीत शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. गटविकास अधिकाऱ्यांबरोबर शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न आणि मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
शिक्षकांना महाराष्ट्र शासनाचा लोगो असलेले स्मार्ट आयकार्ड, सन २००२ मध्ये सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांच्या वेतनातील तफावत, २००६ नंतरच्या शिक्षकांच्या वेतन आयोगातील फरकाचा पहिला हप्ता, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल, अंशदायी पेन्शन योजनेतील त्रुटी शोधण्याबाबत गटविकास अधिकारी नीलेश काळे यांच्यासोबत चर्चा झाली. पंढरीनाथ मनकर यांची संघ सहचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली.
नारायण कांबळे, शोभा वहिले, बाळासाहेब शिंगाडे, रमेश गायकवाड, विलास थोरात, अण्णासाहेब ओहोळ, अनिल कळसकर, प्रमोद भोईर, जगदीश केंद्रे, पंढरीनाथ मनकर, अजय शेळवणे, शिवाजी लोंढे, सुमीत नळे, गंगासेन वाघमारे, भीमेश रोडगे उपस्थित होते. (वार्ताहर)