शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

विद्युतपंपांचे वीजजोड कट केल्याने असंतोष, ३० हजार एकरांवरील ऊसशेती अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:08 IST

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत.

केडगाव : दौंड तालुक्यातील नदीकाठच्या गावातील थकबाकीपोटी सर्व विद्युतपंपांचे वीजजोड महावितरणने तोडले आहेत. यामध्ये एकूण तीन हजार वीजजोड बंद केल्याने दौंड तालुक्यातील एकूण ३० हजार एकर क्षेत्रातील ऊसपीक जळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात शेतक-यांना कसलीही पूर्वसूचना न देता घाईघाईने महावितरणने ही कारवाई सुरू केली असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.नदीकाठच्या पारगाव व नानगावचे वीजजोड गेल्या दोन दिवसांपासून बंद करण्यात आले आहेत. लवकरच राहू, पिंपळगाव, देलवडी, हातवळण, कानगाव, उंडवडी, सोनवडी या गावातील विद्युतपंपांवर कारवाई करण्यात येणार आहे. या गावांतील लाखो रुपयांचे वीजबिल थकल्याने ही कारवाई केल्याचे समजते.शासनाकडून कर्जमाफीप्रमाणे वीजबिल माफ होईल, या आशेने अनेक शेतक-यांनी आपली वीजबिले भरली नव्हती. दोन दिवसांपूर्वी केडगाव येथील विभागीय कार्यालयात वीजजोड बंद करण्याचा संदेश येताच महावितरणने लगबगीने कारवाई करण्यास सुरुवात केली. यावर्षी १४ आॅक्टोबरपर्यंत मुबलक पाऊस होता. त्यामुळे गेले दोन, तीन महिने अनेक शेतक-यांनी आपले विद्युतपंप बंद ठेवले होते. पाऊस उघडल्यानंतर गेल्या आठवड्यात बहुतांशी विद्युतपंप सुरू करण्यात आले होते. महावितरणने कारवाईसुरू करताच शेतकºयांची तारांबळ उडाली आहे.यासंदर्भात पारगावचे शेतकरी सुभाष बोत्रे म्हणाले, की सहा महिन्यांपासून आमच्या विद्युतपंपांना कसलेही बिल महावितरणकडून आले नाही. बिल आले नसल्याने एकूण किती पैसे भरायचे, याची माहिती शेतकºयांना नाही. विशेष म्हणजे हा वीजजोड बंद करताना सर्व शेतकºयांना लेखी सूचना देणे गरजेचे होते. आमचे वीजजोड पूर्ववत सुरू न केल्यास शेतकºयांच्या वतीने आंदोलन केले जाईल.महावितरणचे केडगाव शाखा अभियंता एम. के. पिसाळ म्हणाले, की आम्हाला वरिष्ठांकडून थकबाकीदारांचे वीजजोड बंद करण्याचे आदेश आले आहेत. त्यानुसार कार्यवाही चालू आहे. ज्या शेतकºयांना वीजबिल मिळालेनाही, त्यांनी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, आपले वीजबिल भरून टाकावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यातआले आहे.>इंदापूरला १,१०० कृषिपंपांची बत्ती गुलभिगवण : महावितरण तुमचा बळीराजावर भरोसा नाय काय! असे म्हणण्याची वेळ शेतकºयांवर आली आहे. महावितरणने आता थकबाकीदार शेतकºयांची इंदापूर विभागातील ८०० रोहित्रे व वालचंदनगर विभागातील २९९ रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शेतकºयांची एकच तारांबळ उडाली आहे. तीन, चार वर्षे दुष्काळी परिस्थितीला तोंड देत असताना आता कुठे चांगल्या पावसामुळे दिलासा मिळतो ना मिळतो तोच महावितरण शेतीचे पाणी बंद करीत आहे. त्यामुळे तोंडचा घास काढून घेतल्याची भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.इंदापूर तालुक्यातील भिगवण, तक्रारवाडी, मदनवाडी, पोंधवडी, भादलवाडी येथील तलाव तीन-चार वर्षांपासून कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे पिण्यासाठी पाणी पुरविताना नाकीनऊ आले होते. शेतातील पिके जळून गेली होती. तलावात पाणी नसतानासुद्धा वीजबिल मात्र नियमितयेत होते.यावर्षी शेतातून चार पैैसे मिळतील व थकबाकी कमी होईल, असे वाटत असतानाच वीज बंद करून महावितरणने कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली आहे.

टॅग्स :Puneपुणे