आकडा टाकून वीजचोरी

By Admin | Updated: February 23, 2015 00:46 IST2015-02-23T00:46:02+5:302015-02-23T00:46:02+5:30

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि भोसरी विभागात वेगवेगळ्या कारणास्तव सात टक्के वीजगळती होत आहे. आकडा टाकून वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे.

Disconnect | आकडा टाकून वीजचोरी

आकडा टाकून वीजचोरी

मंगेश पांडे,पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी आणि भोसरी विभागात वेगवेगळ्या कारणास्तव सात टक्के वीजगळती होत आहे. आकडा टाकून वीजचोरीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे याकडे महावितरणने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
शहरात घरगुती वीज ग्राहकांसोबतच उद्योगांना दररोज ५६० मेगावॉट विजेचा पुरवठा केला जातो. औद्योगिकनगरीत सात हजारांहून अधिक उद्योग आहेत. महावितरणचे पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी आणि भोसरी असे दोन विभाग आहेत. या विभागांमध्ये चिंचवड, सांगवी, खराळवाडी, भोसरी विभागात निगडी प्राधिकरण, आकुर्डी या उपविभागांचा समावेश आहे.
पिंपरी विभागात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, कृषी व इतर २ लाख ८६ हजार, तर भोसरी विभागात १ लाख ९८ हजार वीजजोड आहेत. पिंपरी विभागात वीजजोड अधिक असतानाही २६० मेगावॉट विजेची आवश्यकता भासते, तर भोसरीत १ लाख ९८ हजार वीजजोड असतानाही पिंपरीच्या तुलनेत भोसरीला ४० मेगावॉट वीज जास्तीची म्हणजेच एकूण ३०० मेगावॉट विजेची गरज लागत आहे.
वीजवाहक तारांवर आकडा टाकून वीजचोरीचे प्रमाण झोपडपट्टी भागात जास्त आहे. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात ही वीजचोरी होते. पिंपरीतील रिव्हर रोड, रमाबाईनगर, तसेच तळवडेतील सहयोगनगर, त्रिवेणीनगर या भागांत आकडा टाकून वीजचोरी होत असल्याचे दिसून येते.
काही ठिकाणी तारा तुटलेल्या अवस्थेत असतात. यातूनही विजेची गळती होते. अशा प्रकारे वीजगळती होत असल्याने नुकसान होत आहे.

Web Title: Disconnect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.