जारकरवाडी हद्दीत वीजवाहक तारा बाजूला केल्याने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:09 IST2021-07-26T04:09:23+5:302021-07-26T04:09:23+5:30
रस्त्याने जाणारे येणारे नागरिक जीव मुठीत धरून त्या ठिकाणावरून प्रवास करीत होते. ४ दिवसांपासून मुख्य रस्त्यात पडलेले झाडाकडे कोणीही ...

जारकरवाडी हद्दीत वीजवाहक तारा बाजूला केल्याने अनर्थ टळला
रस्त्याने जाणारे येणारे नागरिक जीव मुठीत धरून त्या ठिकाणावरून प्रवास करीत होते. ४ दिवसांपासून मुख्य रस्त्यात पडलेले झाडाकडे कोणीही गांभीर्याने पाहिले नाही. मंचर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक सोमनाथ वाफगावकर याना समजताच त्यांनी तत्काळ जारकरवाडी गावचे एमएसईबीचे कर्मचारी अजित शेळके आणि विशाल काकडे यांना संपर्क साधला. त्यांनी सदर झाड हे मोठ्या स्वरूपाचे असून त्याला उचलण्यासाठी कोणत्याही प्रकारची यंत्रणा त्यांच्याकडे उपलब्ध नाही असे कळवले. तसेच ते स्वतः कुऱ्हाड घेऊन तेथे हजर झाले. सोमनाथ वाफगावकर यांनी तत्काळ धामणी गावचे सरपंच सागर जाधव यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांचेकडून मदत येणेस विलंब झाला. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी प्रथमेश लोंढे यांच्याशी संपर्क साधण्याची सूचना केली. सोमनाथ वाफगावकर यांनी कोणत्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता भीमाशंकर साखर कारखाना येथील सुरक्षारक्षक कैलास गाढवे यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडून जेसीबी मशीन उपलब्ध करून घेतली. त्यानंतर सदरचे विजेच्या हायहोल्टेज तारांवर पडलेले व मुख्य रस्त्यावर पडलेले बाभळीचे झाड स्थानिक लोकांच्या आणि पोलीस मित्रांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला केले. झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.