पावसाअभावी पेरण्यांवर आपत्ती
By Admin | Updated: June 24, 2014 23:19 IST2014-06-24T23:19:29+5:302014-06-24T23:19:29+5:30
हवामान विभागाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.

पावसाअभावी पेरण्यांवर आपत्ती
>पुणो : हवामान विभागाने जुलैच्या पहिल्या आठवडय़ार्पयत पावसाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. परिणामी यंदा कृषी विभागाने जाहीर केलेला पेरणीचा आपत्कालिन आराखडा राबवावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याप्रमाणो शेतक:यांनी पेरणीचे नियोजन केल्यास संभाव्य नुकसान टाळता येऊ शकते, असे कृषी विभागाच्या अधिका:यांनी सांगितले.
हवामान विभागाने यंदा देशभरात सरासरी 95 टक्के पाऊस पडेल असा अंदाज या पुर्वीच व्यक्त केला होता. त्यानुसार पाऊस कमी पडेल असे वाटत होते. मात्र मॉन्सूनसाठी अजूनही अनुकुल परिस्थिती निर्माण झाली नसल्याने जून महिना कोरडा जाणार आहे. परिणामी पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. पेरणीसाठी जून महिना अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात पेरण्या न झाल्यास पीकाच्या उगवणक्षमतेवर व गुणवत्तेवर देखील विपरित परिणाम होते. त्यामुळे पाऊस लांबल्यास पीकाला फटका बसू नये यासाठी कृषी विभागाने आपत्कालिन आराखडा तयार केला आहे. त्यात लांबत जाणा:या मॉन्सूनप्रमाणो पीक पद्धतीत कोणता बदल करावा याची मार्गदर्शक सुचना देखील केली आहे.
सद्य:स्थितीत औरंगाबाद, जालना, बीड, लातुर, परभणी, नांदेड, हिंगोली व उस्मानाबाद या जिल्ह्यात जर 7 जुलै र्पयत समाधानकारक पाऊस पडल्यास तेथे पारंपरिक पीकांची पेरणी करता येईल. इतर जिल्ह्यांना मात्र पीक पद्धतीत व वाणांच्या निवडीत बदल करावा लागणार आहे. भाताच्या पट्टय़ात तर आता पेरणी करताना दीर्घ मुदतीचे वाण न घेता कमी मुदतीच्या वाणांची निवड करावी लागणार आहे.
देशात गेल्या 143 वर्षापासूनची हवामानाची नोंद आहे. या काळात देशाला 23 वेळा दुष्काळाला सामोरे जावे लागले आहे. दुष्काळाचे हे नैसर्गिक चक्र आहे. मात्र 2क्12 नंतर लगेचच 2क्14 साली दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाल्याने त्याची झळ शेतक:यांना तीव्रतेने जाणवणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. राज्यात 2क्13-14 साली जवळपास वर्षभर पावसाची नोंद झाली. गारपीट व अवकाळी पावसाने शेतीचे अपरिमित नुकसान झाले. तर 2क्12 साली पाऊस लांबल्याने राज्याला तीव्र दुष्काळाला सामोरे जावे लागले होते. परिणामी खरीपाबरोबरच रब्बी पीकाचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. त्या पाश्र्वभूमीवर दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पीक पद्धतीच्या बदलावर लक्ष केंद्रीत करणो आवश्यक असल्याचे कृषी अधिका:यांनी सांगितले.
जुलैचा पहिला पंधरवडा
घ्या : बाजरी, राळा, भुईमुग शेंग, एरंड, तुर, कुळीथघेऊ नका : उडीद, मुग
आंतरपीक : बाजरी-तूर (2:1), सुर्यफुल-तुर (1:2)
गवार-तूर (1:2), एरंड-गवार (1:2)
जुलैचा दुसरा पंधरवडा
सुर्यफुल, तुर, राळा, कुळीथ, एरंड
आंतरपीक : सुर्यफुल-तुर (1:2), गवार-तुर (2:1)
ऑगस्ट पहिला पंधरवडा
सुर्यफुल, तुर, कुळीथ, एरंड
आंतरपीक : सुर्यफुल-तुर (2:1)
मिश्र पीक - एरंड-दोडका
ऑगस्ट दुसरा पंधरवडा
सुर्यफुल, तुर, एरंड
मिश्र पीक : सुर्यफुल-तुर (2:1)