आपत्ती व्यवस्थापन कक्ष जूनपासून सुरू

By Admin | Updated: May 27, 2014 06:59 IST2014-05-27T06:59:38+5:302014-05-27T06:59:38+5:30

पूर आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून मुख्य कार्यालयासह सहा क्षेत्रीय कार्यालयात कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या

The Disaster Management Room starts from June | आपत्ती व्यवस्थापन कक्ष जूनपासून सुरू

आपत्ती व्यवस्थापन कक्ष जूनपासून सुरू

पिंपरी : पूर आपत्ती व्यवस्थापन कक्ष १ जूनपासून मुख्य कार्यालयासह सहा क्षेत्रीय कार्यालयात कार्यान्वित करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी अधिकार्‍यांना दिल्या. पूर आपत्ती व्यवस्थापनाबाबत सर्व अधिकार्‍यांची बैठक सोमवारी स्थायी समिती सभागृहात झाला. त्या वेळी ते बोलत होते. सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नदीपात्रत व नदीच्या कडेला तसेच नाल्यांच्या कडेने असलेल्या सर्व घरे व झोपड्यांचा दोन दिवसांत पाहणीदौरा करावा. अतिवृष्टीमुळे होणार्‍या संभाव्य वित्तहानी टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या. पावसाळा सुरू होण्यापूर्वी रस्ता, फुटपाथ दुरुस्ती करणे, उद्यानात अथवा रस्त्याच्या बाजूला पडलेला राडारोडा तातडीने उचलणे, नाल्यांची साफसफाई युद्धपातळीवर करणे अग्निशामक यंत्रणा आणि वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवणे, पूर परिस्थितीवेळी वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवणे, पूरबाधित भागावर लक्ष केंद्रित ठेवणे याबाबत त्यांनी सूचना दिल्या. याशिवाय ज्या ठिकाणी पूर येतो त्या ठिकाणी यंत्रणा सज्ज ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत पूरग्रस्तांच्या निवार्‍यांची व्यवस्था ज्या शाळांमध्ये केली जाते. त्या उपलब्ध करून देण्यासाठी अशा शाळांना पूर्वसूचना द्यावी. (प्रतिनिधी)

Web Title: The Disaster Management Room starts from June