गुळुंचे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच व एक सदस्य अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:14 IST2021-07-14T04:14:03+5:302021-07-14T04:14:03+5:30
--- नीरा : पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावचे थेट सरपंच व तालुक्यात प्रथम थेट सरपंच म्हणून निवडून आलेले संभाजी कुंभार ...

गुळुंचे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच व एक सदस्य अपात्र
---
नीरा :
पुरंदर तालुक्यातील गुळुंचे गावचे थेट सरपंच व तालुक्यात प्रथम थेट सरपंच म्हणून निवडून आलेले संभाजी कुंभार व सदस्य विकास भंडलकर यांना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अपात्र ठरविले आहे. येथील सरकारी गायरान जागेत कुटुंबीयांचे अतिक्रमण दोघांना भोवलं असून या आदेशामुळे गुळुंचे ग्रामपंचायतीला हा मोठा धक्का बसला आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय निगडे, कोळविहिरे गटाचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी नितीन निगडे व स्वप्नील जगताप यांनी सरपंच संभाजी कुंभार यांच्या आई द्वारकाबाई कुंभार तसेच सदस्य विकास भंडलकर यांचे वडील दादा भंडलकर यांचे सरकारी गायरान जागेत अतिक्रमण असल्याने त्यांना पदावरून अपात्र करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्याची चौकशी झाल्यावर त्यात ते दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अपात्र ठरविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.