दूध उत्पादकांना थेट अनुदान देण्यात यावे
By Admin | Updated: November 12, 2014 23:13 IST2014-11-12T23:13:41+5:302014-11-12T23:13:41+5:30
दुधाचे दर 3 ते 4 रुपयांनी घसरल्याने दूध उत्पादकांमध्ये अस्वस्था पसरली आहे. दुसरीकडे पशुखाद्य, चारा यांचे भाव परवडेनासे झाले आहेत.

दूध उत्पादकांना थेट अनुदान देण्यात यावे
सोमेश्वरनगर : दुधाचे दर 3 ते 4 रुपयांनी घसरल्याने दूध उत्पादकांमध्ये अस्वस्था पसरली आहे. दुसरीकडे पशुखाद्य, चारा यांचे भाव परवडेनासे झाले आहेत. यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून कर्नाटक सरकारच्या धर्तीवर दूध संस्थांऐवजी थेट दूध उत्पादकांनाच 3 ते 4 रुपये अनुदान दिल्यास दुग्ध व्यवसाय टिकेल; अन्यथा दुग्ध व्यवसाय मोडकळीस येईल, असे मत शेतक:यांनी व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर घसरल्याचे कारण पुढे करत दूध पावडर व पावडरपासून इतर पदार्थ तयार करणा:या प्रकल्पांनी दुधाच्या खरेदीत घट केली आहे. बारामती दूध संघानेही प्रतिलिटर 2 ते 3 रुपयांनी दर कमी केलेला आहे. गायीच्या दुधाचा दर 23 रुपयांवरून 21 रूपयांवर खाली आणला आहे, तर दुसरीकडे काही पिशवीबंद दूधविक्री करणा:या संस्थांनी दूध पावडर निर्मिती घटल्याने अतिरिक्त दूध वाढण्याचा धोका लक्षात घेऊन दोन रुपयांनी घट करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यस्थी करणा:या सहकारी व खासगी संस्थांनीही शेतक:यांना देत असलेल्या दरात तब्बल 3 ते 4 रुपयांनी घट केल्याने शेतक:यांचे आर्थिक कंबरडे मोडल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, काही दूध संस्था ग्राहकांना स्वस्त दूध देण्याऐवजी आपले दूध जास्तीत जास्त खपण्यासाठी वितरकांनाच जादा कमिशन देण्याचा डाव आखत असल्याचे समजते. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरचे दर कमी झाले आहेत. दूध पावडरसाठी एकूण उत्पादनापैकी 6क् टक्के दूध लागते. मात्र, आता दूध पावडर प्रकल्प धोक्यात आल्याने दूध पावडरसाठी लागणारे दूध ग्राहकांकडे वळविले आहे. अचानक दुधाची आवक वाढल्याने पिशवीबंद दुधाच्या विक्रीत घट आल्याचे दिसत आहे.
परिणामी दूध संस्थांनी शेतक:यांच्या दूधदरात घट केली आहे. गेली दोन वर्षे दूध पावडरला चांगले दर मिळत होते. जवळपास 272 रूपयांर्पयत दूध पावडरचे दर गेले होते. आता ते 16क् ते 17क् रूपयांवरच घुटमळत आहेत. त्यामुळे शेतक:यांना 3.5 फॅटला प्रतिलिटर 23 ते 24 रूपये दर मिळत होता. यामुळे शेतक:यांकडून पावडर प्रकल्पांना दूध देण्याचे प्रमाण वाढले होते. दुसरीकडे पावडरीचे दर तेजीत असल्याने पिशवीबंद दुधालाही चांगला दर मिळत होता.
आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर घसरलेला दूध पावडरीचा परिणाम देशातील इतर राज्यांच्या तुलनेत जादा दिसतो. दूध व्यवसायावर सरकारचे नियंत्रण नसल्याचे यामुळे लक्षात येते. परिणामी याचा आर्थिक फटका दूध उत्पादकांना बसत आहे. भविष्यात अजून दूधदर कपात होण्याचा धोका संभवत आहे. यासाठी शासनाने ऊसदर नियंत्रण मंडळाच्या धर्तीवर ‘दूधदर नियंत्रण मंडळाची’ स्थापना करावी, अशी मागणी शेतक:यांमधून होत आहे. मार्च 2क्13 अखेर दुधाचे दर 3.5 फॅटला 13 रूपये 6क् पैशांवर होता. त्या वेळी गायींच्या खरेदी किमती शेतक:यांच्या आवाक्यात होत्या. त्यानंतर मात्र सप्टेंबर 2क्14 ला तोच दर 23 ते 24 रूपयांवर गेला.
तेव्हा मात्र गायींच्या किमती वाढल्या. त्या 7क् ते 9क् हजारांवर गेल्या. त्यामुळे गायी खरेदी करणो शेतक:यांच्या आवाक्याबाहेर गेल्या. काही पशुखाद्य उत्पादन करणा:या कंपन्यांनी 5क् रूपयांनी पशुखाद्याचे दर कमी केले. मात्र, ते प्रतिकिलो 83 पैसेच कमी केले. दुसरीकडे मात्र दुधाला प्रतिलिटर 3 ते 4 रूपये कमी केले. (वार्ताहर)
दूध धंद्यातील तोटय़ाच्या वेळेही शेतक:यांच्या दूधदरात 3 ते 4 रूपयांनी कपात केली. मात्र परंतु मध्यस्थी करणा:यांचे कमिशन आहे असे ठेवले. यामध्ये मध्यस्थींचा नफा कमी ठेवला, तर 3 ते 4 रूपयांऐवजी कपात करण्यापेक्षा एक ते दीड रूपयांचीच कपात करावी लागेल. आणि दूध धंदाही वाचेल. त्यामुळे मध्यस्थींच्या कमीशनमध्ये कपात करून दुधाला जास्तीत जास्त दर द्यावा, अशी मागणी दूध उत्पादकांकडून होत आहे.
नोक:यांचे प्रमाण घटल्याने अनेक तरूणवर्ग या धंद्याकडे वळला. मात्र, दुधाच्या दरात शासन वारंवार कपात करत असल्याने हा धंदा परवडेनासा झाला आहे. शेतक:यांकडून 2क् रूपये प्रतिलिटरने घेतलेले दूध पॅकिंग करून 4क् रूपयांनी विकले जाते. त्यामुळे शेतक:यांच्या हातात काहीच उरत नाही. उरते ते फक्त शेणच.
- शरद जगताप,
दूध उत्पादक शेतकरी