शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

डेक्कन क्वीनची प्रशस्त डायनिंग कार सज्ज; लवकरच सेवेत दाखल होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 15:11 IST

पुणे-मुंबईदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही डायनिंग कार विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ..

ठळक मुद्देमध्य रेल्वे : सुविधा अत्याधुनिक असणार  एकाचवेळी ४० प्रवासी खाद्यपदार्थांचा आस्वाद

पुणे : भारतीय रेल्वेसाठी प्रतिष्ठेची असलेल्या डेक्कन क्वीनला नवी झळाळी मिळणार आहे. प्रवाशांसाठी आकर्षण असलेल्या डायनिंग कारचा चेहरामोहराही बदलण्यात येणार आहे. एकाचवेळी ४० प्रवासी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊ शकतील, अशी प्रशस्त कार सज्ज झाली आहे. पुढील काही दिवसांत ही कार प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. देशभरात नियमितपणे धावणाऱ्या प्रवासीरेल्वेगाड्यांमध्ये डेक्कन क्वीनची पॅन्ट्रीसह असलेली डायनिंग कार एकमेव आहे. जून महिन्यातच या गाडीला ९० वर्षे पूर्ण झाली आहेत. रेल्वेच्या शिरपेचातील मानाचा तुरा असलेल्या डेक्कन क्वीनला प्रवाशांची नेहमीच पसंती असते. पुणे-मुंबईदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी ही डायनिंग कार विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. काही तांत्रिक कारणास्तव मध्य रेल्वेने २०१५ मध्ये डायनिंग कार काढली होती. त्याला प्रवाशांनी जोरदार विरोध केला. या विरोधानंतर काही महिन्यांनी पुन्हा डायनिंग कार जोडण्यात आली. रेल्वेकडून लांबपल्ल्याच्या गाड्यांचे पारंपरिक डबे बदलून लिंके-हाफमन बुश (एलएचबी) प्रकारातील डबे जोडले जात आहेत. अनेक गाड्यांमध्ये हा बदल करण्यात आला आहे. आता डेक्कन क्वीनलाही एलएचबी कोच मिळणार आहेत. त्याअंतर्गतच डायनिंग कारचे रुपडेही बदलण्यात येणार आहे.रिसर्च, डिझाईन, अ‍ॅन्ड स्टँडर्ड आॅर्गनायझेशन (आरडीएसओ) या रचनेला मान्यता दिली आहे. दरम्यान, एलएचबी कोचमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी होणार आहे. गाडी सुरू होण्याच्या किंवा थांबण्याच्या वेळी झटके बसणार नाहीत. डब्यांमध्ये सुविधाही आधुनिक असून गाडीचा वेगही ताशी १६० ते २०० किलोमीटरपर्यंत असणार आहे. पुढील काही दिवसांत रेल्वे प्रवाशांच्या सेवेत ही गाडी दाखल होणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. .......च्नवीन डायनिंग कारमध्ये एकावेळी ४० प्रवासी बसू शकतात. सध्या मर्यादित जागा असल्याने अनेक प्रवाशांना वाट पाहत बसावे लागते. च्नव्या कारच्या खिडक्याही मोठ्या आकारातील असल्याने निसर्गसौंदर्याचा आनंद घेत खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. च्प्रवाशांना नवनवीन खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याचीही रेल्वेची योजना आहे.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईrailwayरेल्वेpassengerप्रवासीfoodअन्न