पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती. आज प्रत्यक्ष महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी भिसे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर
आता अकरा वाजता आयुक्त कार्यालयामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं बैठक आज झाली. याच्यामध्ये राज्यसमितीच्या वतीनं जी समिती केलेली आहे. डॉ राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य समिती आहे. तर समितीचा शासनाचा अहवाल आयुक्त कार्यालयामध्ये सादर करण्यात आला आहे. त्यानंतर महिलेला योग्य ते उपचार न दिल्याने रुग्णलाय दोषी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चाकणकर म्हणाल्या, हॉस्पिटल नक्कीच जबाबदार आहे. त्यांची चूक मोठी आहे. भिसे यांचा रक्तस्त्राव झाला तर उपचार केले नाहीत. सूर्या रुग्णालयाकडून तनिषा भिसे यांच्यावर योग्य ते उपचार केरण्यता आले आहेत. रुग्णालयाच्या नावात धर्मादाय हा उल्लेख असणं गरजेचं असते. मात्र दीनानाथ रुग्णालयाच्या बाबतीत ते दिसून आले नाही. महिलेला योग्य ते उपचार न दिल्याने रुग्णलाय दोषी आहे. त्यांनी कुठलाही धर्मादायचा नियम पाळलेला नाही. त्यांच्यावर योग्य कारवाई होणार आहे. दीनानाथ रुग्णालयाने या रुग्णाच्या बाबतीत अथवा धर्मादायचेही कोणतेही नियम पाळले नाहीत. रुग्णालयाने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित होतं ते रुग्णाला मिळालं नाही. समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
रुग्णालयाला समज दिली जाईल
पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस आयुक्त आणि इतर अधिकारी, ससून रुग्णालयाचे अधिकारी आज आढावा बैठक घेण्यात आली. भिसे कुटुंबियांच्या घरी जाऊन मी आज भेट घेतली. कोणतीही व्यक्ती डॉक्टरकडे गेल्यावर वयक्तिक गोष्टी सांगत असतात. डॉ घैसास यांच्याकडे रुग्ण १५ तारखेला भेटले होते. त्या अगोदरचे उपचार आणि मेडिकल इतिहास सांगितला होता. घटना घडल्यावर दीनानाथ ने स्वतःची समिती बनवली आणि रुग्णाच्या गोपनीय माहिती मांडली याचा निषेध आणि रुग्णालयाला समज दिली जाईल.
रक्तस्त्राव झाला आणि रुग्णाचा मृत्यू झाला
हॉस्पिटल मध्ये रुग्ण सकाळी ९ वाजून १ मिनिटं यावेळी गेले होते. डॉक्टर यांच्याशी संपर्क झाला आणि सर्जरीसाठी स्टाफ कडे सूचना दिल्या होत्या. ऑपरेशन थिएटर मध्ये जाण्यापूर्वी १० लाख रुपयांची मागणी केली. ३ लाख रुपये आहेत असं कुटुंबियांनी हॉस्पिटलला सांगितले होते. २.३० वाजता रुग्ण बाहेर पडला, ५ तास रुग्णावर प्राथमिक उपचार रुग्णालयाने रुग्णावर केलेले नाहीत. यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णाला ससून मध्ये नेलं. तिथून १५ मिनिटे मध्ये ते बाहेर आले आणि तिथून सुर्या हॉस्पिटल मध्ये नेलं. दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी झाली, रक्तस्त्राव झाला आणि रुग्णाचा मृत्यू झाला.
सखोल चौकशी होणार
१० लाख रुपयांची मागणी केल्यामुळे रुग्णाची मानसिकता खचली. दीनानाथ मंगेशकर, सूर्या हॉस्पिटल आणि ससून रुग्णालयाचा अहवाल दिला आहे. सखोल चौकशी होणार आहे. माता मृत्यू अन्वेषण समिती कडून चौकशी होणार आणि त्यांचा सुद्धा अहवाल येणार. अंतिम अहवाल आज संध्याकाळी येणार. धर्मादाय आयुक्तांचा अहवाल उद्या येणार आहे. तिन्ही समितीचे एकत्रित अहवाल आणि नातेवाईकांनी केलेली तक्रार यावर अंतिम निष्कर्ष होईल.
रुग्णालय दोषी आहे
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याशी सुद्धा याप्रकरणाचा बाबत बोलणे झालं आहे. धर्मदाय आयुक्तालयांची नियमावली दीनानाथ रुग्णालयाने पाळली नाही. यातील एक म्हणजे रुग्णालयाच्या नावासमोर धर्मदाय असं लिहणे महत्वाचे असतं. रुग्णालयाने रुग्णावर उपचार करणे अपेक्षित होतं ते उपचार मिळाले नाहीत. हा ठपका रुग्णालयावर ठेवण्यात आलेला असून रुग्णालय दोषी आहे.