दिलीप खैरे मुख्य प्रशासक
By Admin | Updated: January 1, 2016 04:28 IST2016-01-01T04:28:47+5:302016-01-01T04:28:47+5:30
पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खैरे हे बारामती तालुक्यातील खंडूखैरेवाडी येथील रहिवाशी आहेत.

दिलीप खैरे मुख्य प्रशासक
बारामती : पुणे प्रादेशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी दिलीप खैरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खैरे हे बारामती तालुक्यातील खंडूखैरेवाडी येथील रहिवाशी आहेत. गेली अनेक वर्षे भाजपाचे क्रियाशील पदाधिकारी आहेत.
समितीच्या उपमुख्य प्रशासकपदी ते यापूर्वी कार्यरत होते. भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवरही त्यांनी काम केले आहे. बारामती तालुक्यातील जिरायत भागाचा पाणी प्रश्न व अन्य प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठविला आहे. बाजार समितीच्या मुख्य प्रशासकपदी त्यांची राज्यपालांच्या आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या उपमुख्य प्रशासकपदी भूषण तुपे (हडपसर, हवेली) यांची, तर सदस्यपदी एकनाथ टिळे (शिवणे, ता. सावळ), संतोष खांदवे (लोहगाव, ता. हवेली), राजेंद्र कोरपे (तुळशीबागवाले कॉलनी, पुणे), मंगेश मोडक (सांगवी, ता. भोर), हनुमंत शिंदे (विंझर, ता. वेल्हे), प्रताप चव्हाण (शिक्रापूर, ता. शिरूर) व गोरख दगडे (बावधन, ता. मुळशी) यांचा समावेश आहे. खैरे यांच्या नियुक्तीबद्दल बारामतीतील विविध संघटनांनी त्यांचे अभिनंदन केले. आमदार योगेश टिळेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी मुख्य प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला. (प्रतिनिधी)