शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर

By अजित घस्ते | Updated: May 9, 2023 15:20 IST

उपसभापतीपदी रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड

पुणे : पुणे जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या "सभापती" पदी निवड मंगळवारी सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनलचे दिलीप काशिनाथ काळभोर" यांची तर "उपसभापती" पदी लोणी कंद येथील "रवींद्र नारायण कंद" यांची बिनविरोध निवड झाली आहे. दिलीप काळभोर यांची दुसऱ्यांदा सभापतीपदी निवड झाली आहे. तर रविंद्र कंद हे पहिल्यांदांचा निवडुन आले आहेत.  

सभापती व उपसभापती पदाच्या निवडीसाठी हवेली बाजार समितीच्या मार्केटयार्ड येथील कार्यालयात सर्व नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. जिल्हा उपनिबंधक (ग्रामीण ) तथा निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या निवडणुकीसाठी सभापतीपदासाठी दिलीप काळभोर तर  उपसभापदासाठी रविंद्र कंद यां दोघांचे उमेदवारी अर्ज आल्याने निवडणुक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी वरील दोघांच्या निवडीची घोषणा केली. 

हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या अठरा जागांच्यासाठी नुकतीच निवडणुक झाली होती. या झालेल्या भारतीय जनता पक्षाचे प्रदीप कंद व पीडीसीसीचे संचालक विकासनाना दांगट यांच्या नेतृत्वाखालील "अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीने 13 जागा जिंकल्या होत्या. तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या "अण्णासाहेब मगर सहकार पॅनेल" ला अवघ्या 2 जागांच्यावर समाधान मानावे लागले होते. तर व्यापारी व हमाल-मापाडी गटातुन  तीन उमेदवार स्वतंत्र निवडून आले यांमध्ये व्यापारी आडते संघातून गणेश घुले, अनिरुद्ध भोसले तर हमाल मापाडी मधून संतोष नांगरे संचालक झाले आहेत.

दरम्यान सभापती व उपसभापतीपदाच्या निवडी जाहीर होताच, भारतीय जनता पक्षाचे वरीष्ठ नेते तथा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीप कंद व पीडीसीसीचे संचालक विकास दांगट, बाजार समितीचे वरीष्ठ संचालक रोहिदास उंद्रे, प्रशांत काळभोर, सुदर्शन चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलीप काळभोर व रविंद् कंद यांना पुष्पहार घालुन अभिनंदन केले. यावेळीं मार्केटयार्ड आवारात गुलाल लावून आनंद उत्सव साजरा करण्यात आला तसेच बाजार परिसरातून सर्व संचालक मिरवणूक काढून जल्लोष करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेMarketबाजारElectionनिवडणूकVotingमतदानFarmerशेतकरी