शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

त्याने मुलगी मेलीये का? हे पाहण्यासाठी कर्कटकाने ओढले मृतदेहावर ओरखडे, तरुणाला जन्मठेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 21:15 IST

तिच्या चेह-यासह शरीरावर 25 ठिकाणी ओरखडे ओढून जखमा करणा-या 19 वर्षीय विकृत तरूणाला न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली

पुणे: एकतर्फी प्रेमातून दहावीमध्ये शिकणा-या अल्पवयीन मुलीचा बलात्कार करून तिचे नाक, तोंड दाबून खून करणा-या आणि त्यानंतर ती मेली आहे का हे तपासून पाहण्यासाठी कंपासपेटीतील करकटकाने तिच्या चेह-यासह शरीरावर 25 ठिकाणी ओरखडे ओढून जखमा करणा-या 19 वर्षीय विकृत तरूणाला न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी. एम. देशपांडे यांनी हा आदेश दिला. आकाश नाथा कोळी (वय 19, रा. भेगडे चाळ, पाषाण) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. आरोपीने दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावास, बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी 10 वर्षे कारावास आणि 5 हजार रुपये दंड आणि भादंवि कलम 404 अन्वये तीन वर्षे शिक्षा आणि पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात खून, बलात्काराचाप्रयत्न या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाषाण परिसरात शिकवणीवरून रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास मुलगी पायी घरी परतत असताना 8 सप्टेंबर 2012 रोजी हा प्रकार घडला. सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. त्यांनी 19 साक्षीदार तपासले. त्यामध्ये नोडल ऑफिसर दत्ता अंगरे यांची साक्ष महत्वाची ठरली.

इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेणारी मुलगी 8 सप्टेंबर रोजी रात्री उशिरापर्यंत शिकवणीवरून घरी परतली नसल्याने तिच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली. दरम्यान, दुस-या दिवशी पाषाण येथील  डीएससी क्वार्टर्सक्‌च्या मोकळ्या मैदानावर मुलीचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून वडापावच्या गाडीवर काम करणा-या आकाश कोळी याला अटक केली.

मुलीवर एकतर्फी प्रेम  असलेल्या कोळी याने घटनेच्या दिवशी रात्री साडेसात वाजता शिकवणीवरून परतत असलेल्या मुलीस अडविले आणि तिच्यावर प्रेम असल्याचे सांगितले. मात्र, मुलीने त्याला नकार  दिल्यामुळे चिडलेल्या कोळी याने तिला ओढत रस्त्याच्या बाजूच्या मैदानावरील झुडपात नेले तसेच मुलीने मदतीसाठी ओरडू नये यासाठी त्याने गवताने तिचे नाक आणि तोंड दाबून धरले. आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.  यात तिचा मृत्यू झाला. ती मेलीये का हे पाहण्यासाठी तिच्या शरीरावर करटकाने ओरखडे ओढले आणि मृतदेह टाकून तो मुलीचा मोबाईल घेऊन पळून गेला असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीस आले होते. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिसDeathमृत्यू