दिग्विजय भोंडवे ची महाराष्ट्र कुस्ती संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:10 IST2021-03-22T04:10:47+5:302021-03-22T04:10:47+5:30

ज्युनियर नॅशनलसाठी काल मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज पुणे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्याची कुस्ती निवड ...

Digvijay Bhondwe selected for Maharashtra Wrestling Team | दिग्विजय भोंडवे ची महाराष्ट्र कुस्ती संघात निवड

दिग्विजय भोंडवे ची महाराष्ट्र कुस्ती संघात निवड

ज्युनियर नॅशनलसाठी काल मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुल कात्रज पुणे येथे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने महाराष्ट्र राज्याची कुस्ती निवड चाचणी झाली . निवड चाचणीत पै. दिग्विजय संदीप भोंडवे याने 130 कीलो ग्रिकोरोमन या वजनगटामध्ये कोल्हापूर च्या अतुल मानेवर विजय संपादन करीत महाराष्ट्र कुस्ती संघामध्ये स्थान मिळविले.

पै. दिग्विजय हा लोणीकंद (ता.हवेली) येथील जाणता राजा कुस्ती केंद्रामध्ये सराव करत असुन एन.आय.एस. कुस्ती कोच जी. एस. सांगा व महीपत कुंडु यांचे मार्गदर्शन त्याला मिळत आहे . पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांचा तो चिरंजीव असुन कुस्ती केंद्राचे अध्यक्ष सचिन पलांडे , पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्याचे अभिनंदन केले .

Web Title: Digvijay Bhondwe selected for Maharashtra Wrestling Team