असोचेमतर्फे डिजिटल सेवांकरिता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:19 IST2021-05-05T04:19:36+5:302021-05-05T04:19:36+5:30

पुणे, असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम) यांचेतर्फे डिजिटल सर्व्हिसेसबद्दल सहकारी बँकिंग क्षेत्रात कॉसमॉस बँकेस पुरस्कार ...

For digital services by Assocham | असोचेमतर्फे डिजिटल सेवांकरिता

असोचेमतर्फे डिजिटल सेवांकरिता

पुणे,

असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचेम) यांचेतर्फे डिजिटल सर्व्हिसेसबद्दल सहकारी बँकिंग क्षेत्रात कॉसमॉस बँकेस पुरस्कार प्रदान करण्यात आला. नुकताच ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रम झाला. ‘आत्मनिर्भर भारत’ या उपक्रमास संलग्न असलेल्या आर्थिक व बँकिंग क्षेत्रातील संस्थांनी दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले.

कॉसमॉस बँक ही इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय, आयएमपीएस यांसारख्या विविध डिजिटल सेवा देण्यामध्ये अग्रगण्य सहकारी बँक असून ग्राहककेंद्रित अत्याधुनिक सेवा देण्यामध्ये कायमच अग्रेसर राहिली आहे. खाजगी क्षेत्रातील बँकांच्या तोडीस तोड कॉसमॉस बँक आपल्या ग्राहकांना सेवा देत आहे. असोचेम संस्थेच्या तज्ज्ञ परीक्षकांनी डिजिटल सेवेबद्दल कॉसमॉस बँकेची निवड करून बँकेस विशेष पुरस्काराने सन्मानित केले आहे. (वा.प्र.)

Web Title: For digital services by Assocham