सुट्टीच्या दिवशी २६ जूनला दस्त नोंदणीचे काम सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST2021-06-26T04:09:38+5:302021-06-26T04:09:38+5:30

पुणे : कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन असल्याने दस्तांची नोंदणी होऊ शकली नाही. अशा दस्तांवर देय होणाऱ्या ...

Diarrhea registration will continue on June 26, the day of the holiday | सुट्टीच्या दिवशी २६ जूनला दस्त नोंदणीचे काम सुरू राहणार

सुट्टीच्या दिवशी २६ जूनला दस्त नोंदणीचे काम सुरू राहणार

पुणे : कोरोनामुळे एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन असल्याने दस्तांची नोंदणी होऊ शकली नाही. अशा दस्तांवर देय होणाऱ्या शास्ती कमी केली असून, ती एक हजार रूपये निश्चित केली आहे. शनिवारी (दि.२६) सुटीच्या दिवशी देखील त्यासाठी कामकाज सुरू ठेवण्यात येणार आहे.

या सवलतीचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळावा, यासाठी दस्तऐवज नोंदणीची सुविधा उपलब्ध केली आहे. पुणे ग्रामीण जिल्हयातील सर्व सह दुय्यम निबंधक कार्यालये शनिवारी कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी होईल, अशी माहिती पुणे ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी दि. पं. पाटील यांनी दिली आहे.

सह दुय्यम निबंधक बारामती, बारामती क्र.2, दुय्यम निबंधक कार्यालय, आंबेगांव, भोर, दौंड, इंदापूर, नारायणगांव, केडगांव, खेड, खेड क्र. 2, खेड क्र. 3, लोणावळा, मावळ, मावळ क्र.2, मुळशी, मुळशी क्र.2, जुन्नर, पुरंदर, शिरुर, तळेगांव ढमढेरे, वेल्हा हे कार्यालय सुरु राहणार आहेत.

Web Title: Diarrhea registration will continue on June 26, the day of the holiday